Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

कु.स्वाती गव्हाणे यांची, औरंगाबाद विभागीय युवती आरोग्य समन्वयक म्हणून नियुक्ती ! ! !


उस्मानाबाद (राहुल शिंदे) दि.17 एक युवा पत्रकार सकाळ पेपर तनिष्का व्यासपीठ समन्वयीका,विश्व जन आरोग्य सेवा समिती नांदेडच्या जिल्हा आरोग्य समन्वयक कु.स्वाती गव्हाणे यांची औरंगाबाद विभागीय युवती आरोग्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.समिती मधील आपल्या पदावरील कामगिरी बघता ही पदोन्नती व अतिरिक्त जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत, सचिव, प्रशांत भोसले, प्रदेश सल्लागार निलेश साठे, प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र पाटील यांनी कु.स्वाती गव्हाणे यांच्या सामजिक कार्याची दखल घेऊन निवड केली आहे व तसे नियुक्तीपत्र दिलेले आहे.

आपण विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा आणि वारसा समितीचे नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे मानवतेचे कार्य करून रुग्णांचा आधार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या निवडी बद्दल व पदोन्नती बदल स्वाती गव्हाणे यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध