Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

गोर-गरीबांना अन्न,वस्त्र,आरोग्य गरजा भगवणाऱ्या, स्वच्छतादूत, नवदुर्गा- स्नेहल पंकज शहाणे.


    स्री शक्तीचा गौरव करणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणे साजरा होत आहे.
तरुण गर्जना नवरात्रोत्सव स्पेशल ''जागर नवदुर्गाचा,सन्मान स्री शक्तीचा'' अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवदुर्गाचा परिचय आपण करून घेणार आहोत.

  महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन तुळजापूर नगरीत माणसातील देवदूत पंकज शहाणे यांच्या अर्धागिनी,लोकसेवा फाऊंडेशनच्या सचिव,स्नेहल पंकज शहाणे अगदी आपल्या पतीच्या खांद्याला-खांदा देऊन अक्षरशः कोणतेही सामजिक कार्य,न लाजता,कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अविरतपणे आठ वर्षांपासून करतात. खरोखरच ज्याप्रमाणे संकट समयी भक्तांच्या हाकेला देव धावून येतो त्याप्रमाणेच स्नेहल आपल्या पती सोबत तुळजापूर,उस्मानाबाद,लातूर,सोलापूर, उमरगा बसस्थानकाची, सार्वजनिक स्वच्छतागृहाची, सार्वजनिक स्थळांची झाडूने स्वच्छता करतात पाण्याच्या टॅंकरद्वारे परिसर धुवून स्वछ करतात.

तीर्थक्षेत्र परिसरातील निर्माल्य स्वछ करत आपले समाजिक कार्य जोपासत आहेत. जिल्ह्यातील ऐतिहसिक स्थळांची स्वच्छता करून,स्वछ भारत मिशनचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहचवत आहेत. स्नेहल व पंकज दांपत्यआता सर्व तुळजापूर पावन नगरीत आपल्या कार्यामुळे चर्चेत आहेत,सर्व तुळजापूरकर यांच्या कार्याला दाद देताना दिसतात.

जगावर जागतिक करोना संकट आल्यामुळे त्याला तुळजापूरनगरी देखील अपवाद ठरलेली नाही, अनेक बेवारस,अत्यंत गरजू , निराधार लोक हे भुके वाचून व्याकुळ होऊन हतबल झालेले त्यांना दिसले अशा लोकांना गाव बंद असल्याने कुणी भीक वगैरे काही देत नाही,हाताला कोणतेही काम कोणी देत नाही,हॉटेल वगैरे जवळपास बंदच आहेत.दारोदार भीक हे लोक मागत नाहीत मग उपाशी पोटी बसून असतात बसस्टँड मध्ये किंवा कुठंतरी आडोस्याला हे त्यांना माहिती होते कारण पंकज शहाणे व त्यांच्या सौभाग्यवती आपल्या लहान कन्यासोबत गेली पाच- सहा वर्षापासून लोकसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून या बेवारस, मनोरुग्ण लोकांसाठी कार्य करत आहोत .. 
मग अशा परिस्थितीत आता ह्यांना जेवण कसे द्यावे याचा विचार करून त्यांनी स्वतः व्यक्तिगत पैश्यातून 550 गरजू कुटुंबांना मोफत धान्ये वाटप केले आहे व ही चळवळ चालूच आहे.

ते स्वतः,पती छोटी मुलगी सोबत घेऊन सर्व तुळजापूर मध्ये फिरतात व असे निराधार लोक त्यांच्या चांगल्या ओळखीचे असल्याने ते लगेच आपुलकीने जवळ येतात व समाधानाने जेवण घेऊन जातात तसेच त्यांनी शिवभोजन थाळी बद्दल विचारणा केली पण त्यांना 5 रुपये द्यावे लागतात म्हणून हे निराधार लोक तिकडे फिरकत नव्हते कारण अश्या लोकांकडे 5 रु सुद्धा नाहीत सध्या च्या संकटात.म्हणून त्यांनी व्यक्तिगत व दानशूर लोकांच्या मदतीने ह्या सर्व लोकांचे पैसे भरतात,ह्या लोकांना आता रोज अन्नदान करत आहेत.गेले 3-4 महिन्यापासून .त्यांच्या पोटापाण्याची सोय करत आहेत.

तुळजापूरनगरीत अनेक लोक दर्शनासाठी येतात. यात भिकारी,बेवारस,मनोरुग्ण देखील मोठ्यासंख्येने दिसतात. त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करत असतात परंतू अशा लोकांची सेवा करणे त्यांना कपडे देणे,अंथरूण-पांघरूण देण्याचे काम यांनी केले आहे. गरजू लोकांना कपडे देण्यासाठी कपडा बँक स्थापन करून लातूर , उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात फिरून गोरगरीब व निराधार लोकांना व माता भगिनी याना मोफत कपडे, साड्या वाटप केल्या,आता पर्यंत 12 हजार लोकांना मोफत कपडे वाटप केले, सण उत्सवात त्यांना गोडाचे जेवण देणे.अशांना दवाखान्यात नेहून त्यांच्यावर उपचार करून,स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना स्वगृही सुखरूप सोडवण्याचे काम देखील करत आहेत.

असेच नळदुर्ग येथे काम करत असतांनाचा एक प्रसंग त्यांनी सांगितला, बसस्थानक परिसराची स्वछता करून तेथील मनोरुग्णाला अन्नदान करण्यासाठी गेलो असता,एक मनोरुग्ण घाणीत व भटक्या प्राण्यांत जाऊन बसला होता, आम्ही सहज त्याला बोलायला गेलो तर त्याने अचानक आमच्यावर दगडाने हल्ला चालू केला ..
आम्ही पळत सुटलो पण एक दगड स्नेहल यांच्या डोक्याला घासून गेला,जखमी होता होता वाचले व एक दगड माझ्या कारला लागला ........हा प्रसंग फार भयानक होता.

खरोखरच स्नेहल शहाणे यांच्या कामाकडे पहिल्यावर नवदुर्गेचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.खूप कौतुकास्पद असे कार्य आपल्या परिवारातील सदस्यामार्फत केले आहे व करत आहेत.सलाम अशा स्री शक्तीला! ! !

✍️विभागीय संपादक:-राहूल शिंदे, उस्मानाबाद (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध