Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुळ बिजासनी माता मंदिरात यंदा नवरात्रौत्सव होणार नाही, मंदिर प्रशासनाचा निर्णय...!
मुळ बिजासनी माता मंदिरात यंदा नवरात्रौत्सव होणार नाही, मंदिर प्रशासनाचा निर्णय...!
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील दुर्बड्या येथील मुळ बिजासनी माता मंदिरात यावर्षी होणाऱ्या नवरात्रोत्सव साजरा होणार नसल्याचे मंदिराचे ट्रस्ट व समस्त दुर्बड्या, वकवाड ग्रामस्थ यांचेकडून प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आले असून देशात व महाराष्ट्रात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा दृष्टीने मंदिराच्या ट्रस्ट व समस्त दुर्बड्या, वकवाड ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
पण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माता बिजासनीचे दर्शन घेण्यात येऊ शकते जर पुजा,अर्चना व मानता पुर्ण करावयाची असेल तर सोशल डिस्टंसींगसह मास्क व सॅनिटायझरचा वापर हा करावा लागेल. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जास्त गर्दी न करता शिस्तीने व सोशल डिस्टंसींगसह मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन दर्शन घ्यावे व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे मुळ बिजासनी माता मंदिर प्रशासन व समस्त दुर्बड्या, वकवाड ग्रामस्थ यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा