Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाज मदत केंद्रां कडुन पिडीत सुर्यंवशी कुटुबांला सात्वन भेट म्हणून दिली २१,६०१ रू. आर्थिक मदत..!
भोई समाज मदत केंद्रां कडुन पिडीत सुर्यंवशी कुटुबांला सात्वन भेट म्हणून दिली २१,६०१ रू. आर्थिक मदत..!
शेगाव प्रतिनिधि(उमेश राजगुरे)नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील राजाराम सूर्यवंशी यांचे दि.२५/१०/२०२० रोजी दसऱ्याच्या दिवशीच हृदय विकाराच्या झटक्याने अचानक दुःखद निधन झाले, भूमिहीन व मजुरी करणाऱ्या सूर्यवंशी परिवारातील कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही बाब लक्षात घेऊन एक सामाजिक कर्तव्य म्हणून या पीडित कुटुंबासाठी काहीतरी करावे यासाठी समाजबांधवांनी एकत्र येऊन'भोई समाज मदत केंद्र' या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समाज बांधवांना आवाहन करण्यात आले 'भोई समाज मदत केंद्र ग्रुपच्या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांनी प्रतिसाद दिला व ऑनलाईन पद्धतीने मदतनिधी गोळा करण्यात आला; व जमा झालेला मदतनिधी आज दि.१८/११/२०२० रोजी पीडित कुटुंबाला एकूण २१,६०१ रुपये मदतनिधी चेकच्या माध्यमातून सुपूर्द केला, आपले शंभर रुपये एखाद्या कुटुंबाचा कसा आधार बनतो हे याचे एक उदाहरण आहे प्रत्येक समाजात असा एक तरी ग्रुप असावा की ज्यामुळे अडचणीत असणाऱ्या कुटुंबाला आधार देता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील मदत निधी देणाऱ्या समाजबांधवांचे प्रतिनिधी म्हणून निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष विजयभाऊ साटोटे भोनगाव, भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय अध्यक्ष निलेशभाऊ साटोटे खामगाव, भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव तथा न्युज तरुण गर्जना शेगांव शहर प्रतिनिधि उमेशभाऊ राजगुरे शेगाव,हरीदास जी नंदाने
(शिक्षक)Ad.निलेशजी सातसुरे सर नांदुरा, राजेश जी भामोद्रे माजी सरपंच कुरकुंडी, पांडुरंग बावणे येरळी,सुरेश बावणे (महा.पोलीस )SRPF नागपूर, निषाद पार्टी महाराष्ट्र कार्यअध्यक्ष श्री दिलीपजी घट्टे,श्री गजाननजी ढोके (शिक्षक ) कर्मचारी संघटना शेगांव शहर अध्यक्ष,अशा प्रकारे शिष्ट मंडळ यांनी प्रत्यक्ष पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन मदतनिधी सुपूर्द केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा