Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०
जवाहर मेडिकल फाऊंडेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
उत्तम प्रतिसाद, सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार
धुळे प्रतिनिधी: गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढावलेले आहे. या कोविडच्या संकटातही प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीम मेडिकल कॉलेजतर्फे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वप्रथम प्रवाशांच्या सेवेत हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात सूरूवातीला उपस्थित कर्मचाऱ्यांची ऑक्सीमीटरच्या सहय्याने ऑक्सीजन लेवल तपासण्यात आली त्यानंतर नैत्ररोग,अस्थिरोग,सर्जरी,स्रीरोग,मेडिसीन आदी विभागातील वैदयकीय अधिकाऱ्यांनी बसस्थानकातील कामगार,वाहक,चालक,
सफाई कामगार यासर्व स्टाफची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही दिला.
सदर शिबिरात नव्वद कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक अनुजा दुसाणे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक स्वाती पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक हर्षल गोसावी, वाहतूक नियंत्रक राजेंद्र भावसार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रोहिदासजी पाटील,उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील,अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, उपअधिष्ठाता डॉ.आरती कर्णिक महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी डॉ. सुरज काशीद डॉ. आदित्य थोरात, डॉ. अमित पाटील, डॉ. चैतन्य देवरे, डॉ. आशिष यादव, सुरेश पाटील, प्रवीण राजपूत, चारू यादव, प्रगती यादव, नीलिमा गावित, प्रांजल गावित, प्रतीक्षा वळवी आदींनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा