Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिवसेनेच्यावतीने वाहतूक निरीक्षक सांगली आदरणीय प्रज्ञा देशमुख मॅडम यांना समक्ष निवेदन...!
शिवसेनेच्यावतीने वाहतूक निरीक्षक सांगली आदरणीय प्रज्ञा देशमुख मॅडम यांना समक्ष निवेदन...!
सागली प्रतिनिधी:सोमवार दिनांक 28 रोजी शिवसेनेच्यावतीने वाहतूक निरीक्षक सांगली आदरणीय प्रज्ञा देशमुख मॅडम यांना समक्ष निवेदन देऊन व महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक,पोलीस महानिरीक्षक,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक सांगली, यांना निवेदनाची प्रत पाठवून अशी मागणी करण्यात आली की महापालिका क्षेत्रातील सुमारे 30 ते 40 चौकांमध्ये वाहतुकीच्या शिस्तीसाठी सिग्नलची व्यवस्था नसल्याने अशा चौकात अत्याधुनिक सिग्नल्स बसवावेत तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यावर आर.सी.सी R.C.C कायमस्वरूपी रस्ते दुभाजक बसवावेत व सर्व रस्त्यावर गल्लीबोळात सहितथर्मो प्लास्ट पांढरे दर्जेदार झेब्रा क्रॉसिंग व रस्त्याच्या मध्यभागी पांढऱ्या थर्मो प्लास्ट पट्टे मारावेत व तरुण भारत स्टेडियम ते राजवाडा चौक ते जुना स्टेशन चौक (बाळासाहेब ठाकरे चौक) ते कांग्रेस भवन चौक ते राम मंदिर चौक ते जिल्हापरिषद पर्यंत या रस्त्यावर वाहतुकीसाठी उड्डाणपूल करावे .
तसेच मार्केट यार्ड चौक विश्रामबाग चौक व नवीन कोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर चौक येथे सुद्धा उड्डाणपुलाची निर्मिती करावी तसेच मिरजेतील मिशन हॉस्पिटल चौक येथे उड्डाणपूल करावे व मिरज येथील जुने बस स्टँड चौकात उड्डाणपूल करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले सदरच्या प्रश्नी महापालिकेने येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी व राज्य शासन व महापालिका मिळून एकत्रितपणे सांगलीतील वाहतुकीसाठी प्रयत्न करून वरील प्रमाणे जनतेची मागणी पूर्ण करावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना वाहतूक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख मॅडम म्हणाल्या की सदरच्या प्रश्न सिग्नलचा प्रश्न आमच्या कक्षेत येतो व रस्ता दुभाजक झेब्रा क्रॉसिंग सुद्धा आमच्या कक्षेत येतो .
त्यामुळे आम्ही ताबडतोब प्रस्ताव महापालिकेकडे पाठवून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्यांनी शिवसेना शिष्टमंडळाला सांगितले तसेच आर.सी.सी R.C.C कायमस्वरूपी रस्ता दुभाजक साठी महापालिकेला निधी उभा करावा असे पत्र देणार असल्याचे सांगितले .
या सर्व गोष्टीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने राज्य शासन व महापालिका यांनी मिळून एकत्र खर्च करून ( सांगली मिरज महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता ) व काही अंशी कर्ज स्वरूपात रक्कम घेऊन सदरचे जनतेच्या मागण्या पूर्ण करावेत असे शिवसैनिकांचे मत आहे तसेच वरील प्रमाणे प्रश्न मार्गी लावल्यास महापालिका क्षेत्रात अपघातात* कायमस्वरूपी अपंगत्व येणारे व बळी जाणारे नागरिकांचे प्राण वाचतील या मागण्यांचे निवेदन देण्यात आले
सदरचे निवेदन रजिस्टर पोस्टाने वरिष्ठांना पाठवण्यात आले आहे
यावेळी रावसाहेब घेवारे बाळासाहेब मगदूम प्रभाकर कुरळपकर प्रसाद रिसवडे जितेंद्र शहा राहुल यमगर इत्यादी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा