Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग,किल्ले, स्मारके, संग्रहालये, लेणी पर्यटकांसाठी खुली...
जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग,किल्ले, स्मारके, संग्रहालये, लेणी पर्यटकांसाठी खुली...
प्रमाणित कार्यपद्धतीच्या (SOP)मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर
ऐतिहासिक वास्तु, दुर्ग,किल्ले, स्मारके, संग्रहालये, लेणी पर्यटकांसाठी खुले
-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.17 जिल्ह्यातील करोना विषाणु(COVID-19)चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने भारत सरकार,महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांतील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, दुर्ग/किल्ले,स्मारके,संग्रहालये, लेणी इ.पर्यटकांसाठी खुले करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे निर्गमित केलेल्या तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या व निर्गमित करण्यात येणा-या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी आवाश्यक शारिरीक अंतर (Physical distance)बाळगणे,मास्क घालणे व वेळोवेळी Handwash/Sanitization करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
सदर आदेशाचे अंमलबजावणी दि.15डिसेंबर- 2020 पासून लागू करण्यात येत आहे.असे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा