Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० जानेवारी, २०२१
प्रेमसंबंधातील मुलांच्या शिक्षेसाठी पोस्को कायदा नाही..! मद्रास हायकोर्ट..!
चेन्नई प्रतिनिधी:त्या किशोरवयीन मुलांना पोस्को कायद्यान्वये शिक्षेची तरतुद नाही जे अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने संबंध ठेवतात, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने एका निर्णयात दिला आहे.न्या. एन.आनंद व्यंकंटेश यांनी नमुद केले आहे की अल्पवयीन मुलांचा लैंगीक गुन्ह्यातून बचाव करण्यासाठी पोस्को कायदा अंमलात आणला होता. मात्र अल्पवयीन मुला व मुलींचे परिवारजन मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत. प्रेमसंबंध असणा-यांसाठी सामाजीक गरजांच्या बदलांसोबत योग्य तो ताळमेळ राखत बदल करावा लागेल. शारिरीक बदलातून जाणा-या प्रेमी युगुलांसाठी पालकांसोबत समाजाचे समर्थन गरजेचेआहे.
एका रिक्षा चालकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार दाखल प्रकरण न्या. व्यकंटेश यांनी रद्द केले आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याच्यावर हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. न्या. व्यंकटेश यांनी म्हटले आहे की शारीरीक बदलातून जाणा-या अल्पवयीन मुलामुलींमधे निर्णय घेण्याची क्षमता नसते. अशा मुला मुलींना पालकवर्गासह समाजाचे समर्थन मिळणे गरजेचे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा