Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

पाचोरा शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर होणार..! आ.किशोर पाटील..!



पाचोरा प्रतिनिधी:पाचोरा शहरातील नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमितधारक रहिवासीयांसाठी आनंदाची बातमी असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अतिक्रमित घरे राहिवाश्यांच्या स्वतःच्या नावावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील सुमारे ३५००अतिक्रमीत घरे नियमानुकुल होणार आहेत .आमदार किशोर पाटील व पाचोरा नगरपालिकेच्या पुढाकाराने येत्या सोमवार पासून पाचोरा शहरातील विविध भागातील अठरा ठिकाणी वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या मोजणी प्रक्रियेला इपीएस प्रणाली द्वारे गती देण्यात येणार असून आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत या बाबतचे निर्देश दिले आहेत.

आगामी काळात या राहिवाश्यांचे स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.दरम्यान भडगाव शहरातील देखील २०११ पूर्वीच्याअतिक्रमण धारकांची यादी करण्याचे आदेश संबंधितांना दिले असून आगामी २-३ दिवसात यशवंत नगर भागासह संपूर्ण भडगाव शहरातील घरे देखील पाचोऱ्याच्याच धर्तीवर नियमित करण्यात येणार आहे.

दरम्यान शुक्रवारी ता. २९ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्डींकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील ,प्रवीण ब्राह्मणे यांचेसह मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भगवान भोये, शहर भूमापक PV कुलकर्णी,नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, यांचे सह नगरपालिका व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०११ व त्याआधीचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण असून याबाबत पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला आहे.
पाचोरा शहरातील बाहेरपूरा,बहिरमनगर,
बंजारा वस्ती,भीमनगर,भोईवाडा,गोंडवस्ती,
हनुमान नगर, जनता वसाहत,कुर्बान नगर, महात्मा फुले नगर,माहेजी नाका, मिलिंद नगर,नागसेन नगर, दसेरा मैदान ( मोंढाळा रोड),रसूल नगर,श्रीराम नगर,वंजार वाडी, वरखेडी नाका भागातील सुमारे ३५०० घरे नगर पालिकेच्या नोंदी प्रमाणे अतिक्रमित असून याच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीसाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मधुकर सूर्यवंशी,कनिष्ठ अभियंता हिमांशू जैस्वाल,सहाय्यक प्रकाश पवार ,विलास देवरे यांचेसह कर्मचारी मदत करणार असून त्यामुळे मोजणी प्रक्रियेस गती मिळणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध