Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

नववधूने लग्नानंतर अवघ्या दोन तासात मंडपातच ऑनलाईन पेपर दिल्याने सर्वत्र तिचे कौतुक...!



शिरपूर/प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे चि.सौ. कां. शुभांगी या नववधूने लग्नानंतर अवघ्या दोन तासात मंडपातच ऑनलाईन पेपर दिल्याने सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.

उंटावद येथील राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य रामकृष्ण विठोबा महाजन यांची कन्या चि.सौ.कां.शुभांगी हिचा विवाह उंटावद येथीलच सुरेश नागो महाजन यांचा मुलगा चि.स्वप्निल यांच्याशी दि.३० जानेवारी रोजी दुपारी आयोजीत करण्यात आला होता. 

परंतु त्याच दिवशी वधू शुभांगी हिचा एस.वाय.बी.एस्सीचा फिजिक्स-इलेक्ट्रॉनिक्सचा ६० मार्काचा पेपर असल्यामुळे लग्नाची तारीख मागेपुढे करण्याचा निर्णय होत होता. परंतु नववधुने लग्नाच्या दिवशीच मी पेपर देऊ शकेल अशी मनाची तयारी दाखविल्याने त्याच दिवशी विवाह सोहळा निश्चित करण्यात आला व दि.३० रोजी मोठया थाटात विवाह संपन्न झाला. घरात लग्राचे वातावरण असतांना देखील नववधूने अभ्यासाकडे तितक्याच मोठ्या कटाक्षाने लक्ष दिले.

विवाह सोहळा संपत्र झाल्यानंतर दुपारी ३ वाजता पेपरची वेळ झाल्यामुळे नववधू शुभांगी ही सासरकडील मंडळी व आईवडीलांचा आशिर्वाद घेवून मंडपातच एका बाजूला जात मोबाईलद्वारे पेपर देण्यास सुरुवात केली. 

सदर पेपर हा एका तासाचा होता यातील ४० प्रश्न सोडवून तिने विवाह बंधानात अडकल्यानंतर देखील आपल्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्याने समाजात एक आदर्श निर्माण केला. पेपर पुर्ण दिल्यानंतर विवाह सोहळ्याच्या अर्पण राहिलेल्या विधी पुर्ण करण्यात आल्या. तिच्या या कृत्तीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध