Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ६ मार्च, २०२१

उस्मानाबाद (धाराशिव) शहर सि.टी.बस सेवा चालू करावी - मनसे


उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.6 शहरात गेल्या 4ते5वर्षापासुन सि.टी.बस सेवा बंद आहे त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, त्यातच सध्या कोव्हिड 19 पार्श्वभूमीवर व्यवसायिक व मजुरी करणारे गरीब नागरिकांना वेळेवर काम मिळत नसल्या कारणाने त्यांची हाल-अपेष्टा होत आहे.

 इंधन दरवाढीमुळे खाजगी वाहन धारकाने आपले भाडेवाढ करून नागरिकांना व प्रवाशांना आणखीनच अडचणीत आणले आहे त्यात खाजगी रिक्षा, टमटम,इतर यासारखी वाहने जास्तीचे भाडे आकारत असून यामुळे प्रवाशांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. 

त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दि.5 मार्च राजी विभाग नियंत्रक रा.प उस्मानाबाद व मुख्याधिकारी नगरपरिषद उस्मानाबाद यांना निवेदन देऊन उस्मानाबाद शहरात लवकरात लवकर सि.टी.बस सेवा चालू करावी अशी मागणी केली आहे यावेळी पृथ्वीराज शिंदे, सौरभ देशमुख,धिरज खोत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध