Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ मार्च, २०२१

डॉक्टर विनोद भोई यांचा स्तुत्य उपक्रम. खादगाव येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन..!



जामनेर प्रतिनिधी:जामनेर तालुक्यातील खादगाव येथे नुकतेच वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपकेंद्र खादगाव आणि ग्रामपंचायत यांच्या सयुक्त प्रयत्नाने भव्य कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.डॉक्टर विनोद भोई हे सामाजिक दृष्ट्या व गावकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच बांधिलकी ठेवत असतात.डॉ.भोई यांच्याबाबतीत भोई समाजातीलच नव्हे तर खादगाव येथे जन्मलेले परंतु बाहेर गावाला राहणारे अश्या बऱ्याच व्यक्तींनी आपल्या गावा मध्ये कोरोना काळात डॉक्टर भोई यांनी उत्कृष्ट काम केल्याचे सांगितले. 

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता आपल्या खादगावं गावाचे वेळीच लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले यावेळी १०३ व्यक्तींचे टेस्ट करण्यात आले त्यापैकी पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून ९० व्यक्तिंना कोरोना लसीकरणाचा पहीला डोस देण्यात आला. 

यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी राजेश  सोनवणे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विनोद भोई,जाधव नाना,गोपाल पाटील,माळी सिस्टर खादगाव सरपंच ज्योती चौधरी उपसरपंच प्रतिभा पाटील पोलिस पाटील तुकाराम भोई ग्रामसेवक चंद्रशेकर सोनवणे,गट प्रवर्तक आशा सेविका शोभा ताई, रेखा बर्डे, स्वाती ताई ग्रामपंचायत सदस्य पद्माकर चौधरी आदी सह गावकरी नागरीक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध