Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित
माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित
शिरपूर प्रतिनिधी:माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने व आ.काशिराम पावरा यांच्या सहकार्याने केंद्र शासनाने रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली च्या वतीने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते.
महाराष्ट्र राज्यात तळोदा पासून शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हा मार्ग 753 बी ई हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्र शासनाने घोषित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 अन्वये हा महामार्ग दि. 23 मार्च रोजी डायरेक्टर राजेश गुप्ता यांनी राजपत्राद्वारे घोषित केले.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तळोदा ते बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चित्र बदलणार असून या महामार्गाच्या परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत. आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी हा महामार्ग घोषित होण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र शासनाच्या या राजपत्रातून जाहीर झालेल्या निर्णयामुळे यश आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा