Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला



महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरूच असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे. 


तथापि, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे. एकीकडे मुंबई, पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात 12 फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मागील 10 आठवड्यांत म्हणजेच अडीच महिन्यांत महाराष्ट्रातील तब्बल 23 लाखांच्या घरात नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. सुरुवातीला ही लाट पुणे, मुंबईत आली. त्यानंतर ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरांत वाढत गेली. आता मुंबई, ठाणे, पुण्यात रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र नाशिक व नागपूरसह उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढ कायम आहे.

पुणे, मुंबई, ठाणे शहर व परिसरातील रुग्णसंख्या कमी होण्यामागे अथवा लाट ओसरण्यामागे 14 एप्रिलपासून लावण्यात आलेली संचारबंदी, कडक निर्बंधाचा सकारात्मक परिणाम असल्याचे  बोलले जाते. कारण ही शहरे दाट लोकसंख्येची आहेत. लोकांची वर्दळ कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली असा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध