Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ मे, २०२१

चोपडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा कहर..!प्रशासन सुस्त..! माफिया मस्त



चोपडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा कहर..!प्रशासन सुस्त..! 

चोपडा तालुक्यात सध्या अवैध वाहतुकीचा कहर झाला असून महसूल प्रशासनाने आर्थिक गणित डोळ्यासमोर ठेवत सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.चोपड्या तालुक्यातील तापी काठावरील गावा-गावांत रेतीचे ठीय्ये भर दिवसा मारले जात आहेत .रात्री चोर मार्गाने रेती तालुक्यातील गावा-गावांत व ठेकेदारांच्या साईटवर टाकली जाते .महसूल प्रशासणाचा खालच्या पातळीवर असलेला कोतवाल व  तलाठी पदावरील कर्मचारी गावांत असताना अवैध रेती वाहतुकीचे डेर कुणाच्या परवानगीने मारले जातात ? असा सवाल जनतेतुन विचारला जात आहे.


वाहतूक करत असताना सरास जेसीबीचा वापर होत असताना चोपडा महसूल प्रशासन गप्प का ? तापी नदी अमळनेर व चोपडा तालुक्यातुन वाहत जात असताना अमळनेर तालुक्यात कुठेही रेतीचे ठिय्ये दिसून येत नाही. किंबहुना अमळनेर तालुक्यात  तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस प्रशासन अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्यांना लाखो ,करोडो रुपयांचा दंड करत आहेत.या कारवाईने रेती माफियांच्या पायाखालची जमीन सरकली असून रेती माफियांना  जेलची हवा ,पाणी व अन्न अमळनेर तहसीलदार खाऊ घालत आहेत. तर याउलट चोपडा तहसिलदार अवैद्य रेती माफियांना मेवा खाऊ घालत असल्याचे चित्र तालुक्यात आहे .


चोपडा तालुक्यातील अवैद्य रेती वाहतुकीसाठी स्पेशल पार्सल यावल वरून आणल असून तेच या सर्व प्रकरणात पुढाकार घेवून काम करत असल्याचे तालुक्यातील जनतेच्या तोंडी चर्चा आहे .त्याचा तालुक्यातील पदभार पुर्ण झालेला असताना त्याला मुदत वाढ देवून थांबवण्याचे प्रयोजन काय ?

चोपडा तहसिलदार यांनी अवैद्य रेती वाहतुकीच्या ठिय्यांचे पंचनामे केलेले असून त्यांच्यावर कारवाई केलेली नसल्याने माहिती अधिकारात उघड झाले आहे. या प्रकरणी  तत्कालीन तहसिलदार यांच्यावर कारवाईची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे  तालुका अध्यक्ष यांनी केली आहे.

चोपडा महसूल विभाग अवैद्य रेती वाहतुकीला आळा घालण्यात अपयशी ठरत आहे.रेतीचा काळा बाजार महसूल प्रशासन व रेती माफिया यांच्या संगमताने सुरू असून तालुक्यातील जनता याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे आवाज उठवणार असल्याचे समजते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध