Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ जून, २०२१

माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने,भरतसिंग चौधरी यांच्या गुढग्याच्या वाटीचे यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया



तरुण गर्जना बातमी :शिरपूर माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शहरातील शरदचंद्र नगर येथील रहिवासी भरतसिंग शंकरसिंग चौधरी (वय ७२ वर्षे) यांच्या गुढग्याच्या वाटीचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया संपन्न झाली असून रुग्णाचे नातेवाईकांनी व मित्र परिवार यांनी पटेल परिवाराला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद दिले.

उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी या जेष्ठ नागरिक यांना उपचार मिळवून देण्यासाठी फार प्रयत्न केले.

“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या उक्तीप्रमाणे नेहमीच आरोग्य सेवा तत्परतेने बजावणारे तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांना नेहमी मदतीचा हात देणारे पटेल परिवार हे हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. भरतसिंग शंकरसिंग चौधरी यांच्या गुढग्याच्या वाट्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे क्रिटिकल होते. शस्त्रक्रिया करणे अवघड असतांना व अनेक त्रास भोगत असतांना पटेल परिवाराने मदतीचा हात देऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून देण्याचे पुण्याचे काम केले. 

मुंबई येथील मल्टीस्पेशालिटी प्रायव्हेट नामांकित हॉस्पिटलमध्ये माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सर्व आर्थिक भार उचलून निधी उपलब्ध करून शस्त्रक्रिया करून दिली. या जेष्ठ नागरिकाला स्वावलंबी जीवन जगण्याचा आनंद मिळवून दिल्याबद्दल वरवाडे येथील नातेवाई व मित्र परिवार यांनी जनक व्हीला निवासस्थानी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांना भेटून आभार मानले. यावेळी एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल चे प्रोजेक्ट डायरेक्टर गुलाबराव गुजर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी नगरसेवक दिलीप बोरसे, नातेवाईक मंडळी, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, सुनिल जैन, योगेश्वर माळी, रुग्ण मित्र दिलीप माळी उपस्थित होते.

रुग्णाची व त्यांच्या मुलाची राहण्याची व भोजनाची सर्व व्यवस्था भूपेशभाई पटेल यांनी करुन दिली होती. यासाठी रुग्णमित्र दिलीप माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. बऱ्याच दिवसापासून रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक, मुलगा उपचारासाठी धुळे, नाशिक, शिर्डी, पुणे येथील हॉस्पिटल मध्ये फिरत होते. लाखो रुपये खर्च येणार होता. परंतु सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असल्याने शस्त्रक्रिया कशी करायची या चिंतेत असताना भूपेशभाई पटेल यांच्याकडे आमदार कार्यालयात रुग्ण स्वतः आले.

सोबत माजी नगरसेवक दिलीप बोरसे होते. भूपेशभाई पटेल यांनी स्वतः डॉक्टर यांची अपॉइंटमेंट घेतली. कागदपत्रे पूर्तता ताबडतोब करण्यासाठी आमदार कार्यालयातील रुग्णमित्र दिलीप माळी यांना सांगितले. सर्जन डॉ. जी. एस. सोहनी (नी & हीप रिप्लेसमेंट तज्ज्ञ), डॉ. सुरेश शेट्टी (आर्थो स्पेशालिस्ट) व त्यांची टीम यांनी शर्थीचे प्रयत्न करुन यशस्वी शस्त्रक्रिया केली व जेष्ठ नागरिक यांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान केली. सदर रुग्णाला सहकार्य केल्याबद्दल पटेल परिवाराला शिरपूर तालुक्यातील जनता धन्यवाद देत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध