Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
साक्री,धाडणे भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या माघारी नंतर भाजपची गोची, अपक्ष उमेदवाराला सोबत घेऊन भाजपची प्रतिष्ठा पणाला
साक्री,धाडणे भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या माघारी नंतर भाजपची गोची, अपक्ष उमेदवाराला सोबत घेऊन भाजपची प्रतिष्ठा पणाला
साक्री तालुक्यातील पंचायत समिती पोटनिवडणूक कित धाडणे गंन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो यावेळी देखील भाजपच्या तिकीट वाटप वरून बराचसा गोंधळ पाहावयास मिळाला त्यातच भाजपा पक्षश्रेष्ठींनी मागील उमेदवारांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा गळ घातली मात्र त्यानंतर अनेक प्रसंगांना तोंड देत अखेर भाजपने श्री काकुस्ते यांना उमेदवारी दिली मात्र काही कारणास्तव भाजपच्या या अधिकृत उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेऊन भाजप मला अडचणीत आणले प्रतिस्पर्धी महाविकासआघाडी ने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी देत गळाला लावले मात्र यामुळे भाजपच्या अडचणीत अजून वाढ झाली आणि साक्री तालुक्यातील राजकारणात भाजपची ही गोची पहिल्यांदाच पहावयास मिळाली म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर थेट पक्ष श्रेस्ती पर्यंत जाऊन पोहोचला आणि साक्री तालुक्यातील राजकारणात काय होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
साक्री तालुक्यातील भाजपच्या दोन गद्दावर नेते असताना देखील भाजपची धाडणे गणा आशी नामुष्की होत असेल तर हे भविष्यासाठी पक्षाचा हिताचे नाही असेही भाजप कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे यातच भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी धाडणे गणाची पोटनिवडणूक आता भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार ठाकरे यांना सोबत घेऊन भाजप रणनीती करत असल्याचे दिसते आहे मात्र यात साक्री तालुक्यातील मोठे नेते व पक्ष कार्यकारिणीतील पदाधिकारी श्री सुरेश रामराव पाटील व शिवाजीराव दहिते यांची देखील प्रतिष्ठान पणाला लागली आहे
असे मानण्यास हरकत नाही आता तालुक्यातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र भाजप चा या दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत धुस फूस भाजपाच्या या अपक्ष उमेदवाराला किती फायदेशीर ठरते हे येणार कालच ठरवेल भाजप कार्यकर्ते व समर्थक या अपक्ष उमेदवार साठी किती काम करतील का हा देखील मोठा प्रश्न आहे,
हे येणारा काळच ठरवेल मात्र या दोन्ही नेत्यांनी जर प्रामाणिकपणे पक्षाशी बांधील राहून एक मताने काम केले किंवा मैदानात उतरले तरच भाजपला आपली प्रतिष्ठा कायम ठेवता येऊ शकते अन्यथा या दोन्ही नेत्याचा गटांनी अंतर्गत कलहात महाविकासआघाडी च्या उमेदवाराची देखील विजय मिळू शकतो यात शंका नाही मात्र या दोन्ही नेत्यांचे या गणात असलेले हितसंबंध आता महाविकास आघाडीच्या नेत्याला धूळ चालतील का हे पाहने उत्सुकतेचे ठरेल
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव साक्री
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा