Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय युवकांच्या कार्याचा गौरव!
कोविड-१९पश्चात विविध विषयांवर जागतिक स्तरावर नव्याने मंथन होत आहे.याच श्रृंखलेत "युवकांच्या शाश्वततेवरील परिणाम"या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या आंतरराष्ट्रीय स्वयंस्फुर्त फोरम मध्ये विविध १२० देशातले १२ हजाराहुन जास्त युवक,विचारवंत,शास्रज्ञ, कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकत्र आलेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेला उदघाटनपर संदेश युनेस्कोचे शाश्वतता राजदुत डाॅ शहाबाज खान आॅस्ट्रेलिया यांनी दिलाज्ञभारतातुन एकमेव प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांचा सहभाग होता.
नंदुरबार जिल्ह्यात १९९९ पासुन जैवविविधता आणि कोरोना काळात जलसाक्षरता समितीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन केलेल्या कामाच्या सहाय्याने केलेले सादरीकरण सर्वांना अंतर्मुख करुन गेले. संपुर्ण परिषदेत भविष्यात करायच्या कामांची चर्चा झाली.परंतु भारतातील युवकांनी महाराष्ट्राच्या नंदुरबार सारख्या दुर्गम भागात केलेले शाश्वत कार्य सर्वांसाठी पथदर्शक असल्याचे परिषदेतील मान्यवरांनी गौरविले.तसेच सादरीकरणा नंतर शेवटच्या दिवशी डाॅ पाटील यांनी शाश्वत पर्यटनासाठीच्या बैठकीचे सत्राध्यक्षपद भुषवून परिषदेला या विषयीचा शाश्वत,व्यापक व दुरगामी असा दस्ताऐवज तयार करुन दिला.
परिषदेचे संचालन जमैका येथील शाश्वत विकास तज्ञ,ख्रिस्तोफर चिनापौ यांनी केले, तर संयोजन सहाय्य गाझा विद्यापीठ पॅलेस्टाॅईन चे अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डाॅ विसम अल मद्युन,इंग्लैड चे अभ्यासक डाॅ केवान लिच तसेच जर्मनी,ऑस्ट्रीया,बारबाडोस,जमैका,श्रीलंका,बहारिन,पोर्तुगाल,ॲंटिगुवा,नायजेरिया, त्रिनिदाद,पाकिस्थान,अफ्रिका आदि देशातल्या सहभागींनी उत्फुर्त सहभाग दिला.परिषदेतील या यशाबद्दल
संस्थाध्यक्ष हेमंत वळवी यांनी डाॅ पाटील व जलसाक्षरता समितीचे अभिनंदन
केले आहे!
बाॅक्स
जल,जंगल,जमिन व सजीव यांच्या शाश्वतते साठी युवकांचे कार्य व त्याची दिशा परिषदेत ठरली. त्यावर धडगांव परिसरातींल युवक प्रत्यक्षात कार्य करीत आहेत हि बाब सर्वांना प्रेरणादायी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा