Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१



जमिनीच्या वादातून दाखल असलेल्या गुन्हयातील चॅप्टर केसमध्ये दोन्ही मुलांचे नाव कमी करण्यासाठी ११ हजाराची लाच स्विकारणार्‍या मोलगी येथील हवालदार प्रकाश सिताराम मेढे याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
यातील मुळ तक्रारदार व त्यांची दोन्ही मुले यांच्यावर जमिनीच्या वादावरुन अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. सदर अदखलपात्र गुन्हयांतील चॅप्टरकेस मध्ये दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी मोलगी येथील पोलीस हवालदार प्रकाश सिताराम मेढे यांनी तक्रारदारांकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती ११ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून प्रकाश सिताराम मेढे यांनी आज दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष मोलगी पोलीस स्टेशन मधील पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात स्विकारली. त्यांना पंच-साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक सतिश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ,
पोहवा उत्तम महाजन, पोहवा संजय गुमाणे, पोहवा विलास पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे, पोना दिपक चित्ते, पोना अमोल मराठे, पोना देवराम गावीत, मपोना ज्योती पाटील, पोना नावाडेकर, चापोना महाले यांच्या पथकाने केली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध