Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
चाळीसगाव चे आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !
चाळीसगाव चे आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !
चाळीसगाव अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे घेतात याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंग ऑपरेशन नंतर आज त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेत दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसेच चाळीसगाव तालुक्यातील अवैध धंद्यांचे बाबतीतही तक्रार केली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन करत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचा वसुलीचा प्रकार उघड केल्यानंतर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली यासह तालुक्यातील अवैध धंद्या बाबतही चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांकडे नाराजी व्यक्त करत सविस्तर चर्चा करून आपली तक्रार दिली.
काय होते स्टिंग ऑपरेशनमध्ये
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी स्वतः अवजड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. आमदार चव्हाण पोलिसांना थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला होता.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा