Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
"आक्रोश शेतकरी आंदोलन"14 डिसेंम्बर पासून पेटणार...! आक्रोश कृती समितीचा इशारा...!
"आक्रोश शेतकरी आंदोलन"14 डिसेंम्बर पासून पेटणार...! आक्रोश कृती समितीचा इशारा...!
कासारे साक्री तालुक्यातील पिंपळनेर, लाटीपाडा मध्यम प्रकल्पातून गेल्या साठ वर्षांपासून सोळा गाव काटवान परिसरातील शेतीसाठी उजवी पाटचारी पूर्ण झाली आहे.केवळ छाईल ते बेहेड पर्यंतची चारी अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे बेहेड, विटाई,दारखेल, निळगव्हाण व नाडसे या पाच गावांना पूर्ण क्षमतेने पाणी पोचत नाही.मध्यंतरात अनेकदा निवेदने, आंदोलने केलीत.तत्कालीन स्थितीत निधी मंजूर झाला असतांना काम पूर्ण झाले नाही.
कुठे पाणी मुरले तो संशोधनाचा विषय आहे.पावसाळ्यात पांझरा नदीतून विक्रमी पाण्याचा विसर्ग होतो.उजव्या पाटाच्या वाहिन्या योग्य नसल्यामुळे पाणी असूनही काटवान वासीयांना ते उपलब्ध होत नाही.परिणामी पाण्याअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
गेल्या आठवड्यापासून येथील शेतकरी बांधव व ग्रामस्थ पाटचारी होण्यासाठी पाचही गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन बैठका घेत आहेत.त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे.बेहेड मध्यवर्ती कार्यालय बनविण्यात आले आहे.ग्रामस्थांनी आक्रोश शेतकरी आंदोलन समितीद्वारा टप्प्याटप्प्याने आंदोलन करतील.
काटवान परिसरातील बेहेड,विटाई,दारखेल, निळगव्हाण,नाडसे येथील शेतकरी बांधव व ग्रामस्थ चांगलेच सक्रिय झाले आहेत.
पांझरा मध्यम प्रकल्पावरील उजव्या वाढीव कालव्यावरील वितरिका क्र.१८ ते २४ हे काम साधारणपणे पन्नास वर्षांपापासून प्रलंबित आहे.
काटवान परिसरातील गावे दुष्काळी म्हणून ओळखली जाणारी आहेत.प्रकल्प बांधणीच्या वेळी प्रस्तावित लाभार्थी गावे असतांना सुद्धा गेली पाच दशके पाच गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांना त्यांच्या नैसर्गिक हक्कापासुन वंचित ठेवण्याचे काम हे जिल्हा पातळीवरील दळभद्री सिंचन विभागाने केले आहे.काटवान परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील,ना.ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांची भेट घेतली होती व मंत्री महोदयांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशपत्र ता.३ नोव्हे.२०२० रोजी दिले होते.
यादरम्यान एका वर्षाचा काळ लोटला असून सुद्धा जिल्हा सिंचन विभाग,
कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे या निर्ढावलेल्या अधिका-यांनी काहीही कार्यवाई केली नाही.जिल्हा स्तरावरीला सिंचन विभागात कामाच्या जबाबदारीवरून गांधकाम विभागात कलगीतुरा रंगला आहे.धुळे मुख्य कार्यकारी अभियंते निष्प्रभ ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
उजव्या कालव्याचे रुंदीकरणासह पोटचारी क्रमांक १८ ते २४ यांचे काम झाले तर या पाचही गावातील पाण्याचा मोठा प्रश्न निकाली लागू शकतो.आता शेतकरी बांधव व ग्रामस्थांच्या मनात सिंचन विभागाबद्दल प्रचंड आक्रोश व संताम आहे.आणि म्हणूनच या पाचही गावातील तमाम ग्रामस्थांनी जल आक्रोश शेतकरी आंदोलन समिती स्थापन करीत निर्वाणीच्या इशाऱ्यासोबत मुख्य कार्यकारी अभियंता- धुळे सिंचन विभाग यांनी आता आठ दिवसांची मुदत मागितली होती.
तेही आठ दिवस पूर्ण झाले आहेत.येणाऱ्या आठ दिवसात जर जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांना सु- सुधारित अंदाजपत्रक प्रस्ताव पाठविला नाही
तर आगामी १५ दिवसात विधानसभेच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंत्रालयास घेराव घालून व समांतररीत्या धुळे येथील सिंचन विभागाचे कार्यालय ताब्यात घेत तेथून मा.जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिकारी धुळे,पोलीस अधीक्षक,मंत्रालय मुंबई येथे दिलेल्या निवेदनात दिला आहे.तसेच या
आंदोलनामुळे जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास धुळे जिल्हा सिंचन विभाग जबाबदार राहील.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा