Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

शिवेंद्र राजे भोसले व शरद पवार यांचा भेटीने मोठं मोट्या राजकिय नेत्याचा भुवया उंचावल्या आहेत



मुंबई : साताऱ्याच्या राजकारणातील धाकले महाराज म्हणून परिचीत असलेले जावळीचे आमदार शिवेंद्र राजे भोसले
यांनी २०१९मध्ये भाजपचा रस्ता धरला. असे असले तरी सध्या राष्ट्रवादीत घरवापसीची शक्यता आहे त्यात शिवेंद्र राजे यांचे नाव प्रमुख्याने घेतले जाते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर शिवेंद्र राजे यांनी सिल्व्हर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवेंद्रराजे – शिंदे यांच्यात पुन्हा राजकीय वैर
जावळीचे पवार समर्थक शशिकांत शिंदे यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केवळ एका मताने पराभव झाला. त्यानंतर शिवेंद्रराजे आणि शिंदे यांच्यातील राजकीय वैर उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची नासधुस केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर शिंदे यांनी पवार आणि पक्षाची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला होता.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक
त्यानंतर आता शिवेंद्र राजे यानी शरद पवारांची सिल्व्हर ओके येथे तासभर भेट घेवून चर्चा केली. यावेळी पवार यांनी अभयसिंह राजे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सातारा बँकेचे राजकारण करत असल्याबद्दल शिवेंद्रराजे यांचे कौतुक केल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडी पाहता शिवेंद्राजे यांच्याकडून लवकरच राष्ट्रवादीच्या घरवापसीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवेंद्र राजे इच्छुक असून त्याकरीता पवार यांचे पाठबळ मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्या संदर्भात या भेटीगाठी सुरू आहेत. त्याकरीता आधी काल शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध