Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

चोपडा ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई १४ तलवारीसह ४ आरोपी गजाआड, एक फरार ३ लाख ४८ हजाराचा मुददेमाल जप्त..!



चोपडा प्रतिनीधी : चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक राकेश पाटील यांनी तालुक्यातील सत्रासेन गावापासून दोन
किलोमिटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या चेक पोस्टजवळ मारोती व्हॅन वाहन क्रमांक एम एच १९ सीएफ ४५७१ हे वाहन राजस्थान पुष्कर येथून चौदा तलवारी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती वरुण  चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक राकेश पाटील दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस नाईक राकेश पाटीलने संबधित मारूती सुजूकी ओमनी गाडीला थांबवून अधिक तपासणी केली असता.

यात १४ तलवारी मिळून आल्या तसेच या गाडीत पाच इसम होते तर यातून एक आरोपी मुशरीफ खान रा.भडगाव हा लघुशंकाच्या नावाने थोड्या अंतरावर जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला.


सविस्तर असे की,सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या सत्रासेन येथे फॉरेस्ट चेक पोस्टवर ओमनी MH१९ –सि फ ४५७१ नंबरच्या गाडीतून चौदा तलवारी सापडल्या त्या गाडीची चौकशी करत असताना किमान पाच आरोपी होते त्यातून एक आरोपी हा फरार झाला.

आरोपीकडून तलवारीची किंमत ९८ हजार रुपये,ओमनीची किंमत २ लाख रुपये, चार मोबाईलची किंमत –५० हजार रुपये असे एकूण ३लाख ४८ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात १) मुस्ताकीन खान रा.आस्थानगर,
चाळीसगाव,
२) आरिफ इब्राहिम पिंजारी, घाटरोड, चाळीसगाव, 
३)मेहबूब खान, हरीम खान जमिल खान, घाटरोड,चाळीसगाव, 
४) सलमान खान अय्यूब खान इस्लामपुरा,
चाळीसगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील चौकशी डीवायएसपी ऋषीकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हे.कॉ.शिंगाणे करत आहे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदचे काम सुरू होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध