Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५
वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनीच दिले पकडुन
अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी ,बोदर्डे बाम्हणे, शिवारात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. हे दोन्ही ट्रॅक्टर वाळूसह (गौण खनिज) जप्त करून पुढील कारवाईसाठी अमळनेर येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
आज (दिनांक) मौजे मूडी ब्राम्हणे येथे अनधिकृतपणे गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ब्राम्हणे ,व मुडी ,बोदर्डे ग्रामस्थांनी आडवून ठेवले होते. लगेज मारवड पोलिस दाखल झाले नंतर अमळनेर तहसिलदार यांना कळविण्यात आले तसेच तहसिलदार यांचे देखिल पथक दाखल झाले . पथकाने तात्काळ हे ट्रॅक्टर पकडून जप्त केले. गौण खनिजासह (वाळूसह) हे दोन्ही ट्रॅक्टर नियमानुसार तहसिल कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत. सदर हे दोन्ही टँक्टर बेटावद येथिल मालकाचे असल्याचे सांगितले
सदर कारवाई तहसीलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सुधीर पाटील (ग्राम महसूल अधिकारी, गडखांब), नरेंद्र धनराळे (मंडळ अधिकारी, अमळनेर) बोदर्डे पोलिस पाटिल यांचा समावेश होता.महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी ,बोदर्डे बाम्हणे, शिवारात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आ...
-
शिरपूर प्रतिनिधी : शहरातील मुख्य व्यापारी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएमची यंत्रणा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा