Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

शिरपूर तालुक्यातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गरजू विद्यार्थ्यांना केला गणवेश वाटप



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यतील होळनांथे येथील रामेश्वर रामरतन खंडेलवाल विद्यालयातील शैक्षणिक वर्ष १९९९ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सौज्यापाडा येथील शाळेत गणवेश वाटप केला. याचे सर्वत्र कौतुक होत असून स्नेहमेळावा बरोबरच समाजहिताचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

होळनांथे येथील खंडेलवाल विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन १९९९ च्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22 वर्षांनी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. स्नेहामेळाव्याचा गाजावाजा न करता विद्यार्थ्यांनी महादेव गाव हद्दीतील सौज्यापाडा या दुर्गम भागातील झोपडी वजा शाळेत जाऊन तेथील २७ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. गणवेश मिळाल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमचा आनंद असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. सौज्यापाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील व अमर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.तद्नंतर नागेश्वर मंदिर परिसरात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात सीआरपीएफमध्ये सेवा देत असलेले सैनिक मनोहर महाले यांचा सर्व वर्ग मित्रांकडून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व वर्ग मैत्रिणींना साडी भेट देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले नाव व सध्याच्या व्यवसाय संदर्भ माहिती देऊन आपला परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर महाले यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र शिंधी,तन्वीर शिंपी, अब्दुल पिंजारी,सचिन राजपूत,प्रदीप राजपूत, राजेंद्र राजपूत,विनोद गुजर,अनिल बोरसे,निरंजन पाटील,पंकज जैन आदींसह माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध