Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
शेतकरी विकास फाऊंडेशनने केले,गत 11 वर्षांपासून बंद असलेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यासाठी मोठ्या संख्येने निवेदनावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन !
शेतकरी विकास फाऊंडेशनने केले,गत 11 वर्षांपासून बंद असलेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यासाठी मोठ्या संख्येने निवेदनावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन !
शिरपुर(प्रतिनिधी):- एकेकाळी शिरपूर तालुक्याच्या वैभवशाली सहकार क्षेत्राच्या विकासाचे प्रतीक असलेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना हां मागील 11 वर्षांहून अधिक काळापासून बंद अवस्थेत आहे.तरीही निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या निष्क्रियतेमुळे शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना,गेल्या पाच वर्षातही सुरू झालेला नाही.
सध्या ऊसाच्या तोडणीअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्याही करत आहेत. एवढे असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र समस्याग्रस्त शेतक-यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्यास उदासीनता दाखवित आहेत.
त्यामुळे या साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली तरच शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटतील,असा विश्वास स्थानिक शेतकरी व साखर कारखान्याचे सभासद, कर्मचारी व शेतकरी विकास फाऊंडेशन ला वाटतो. किसान विकास फाऊंडेशनचाही प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणी ला पाठिंबा आहे. मात्र सर्व सभासद आणि ऊस उत्पादकांच्या मागणीवरून शेतकरी विकास फाऊंडेशनने तातडीने प्रशासक नेमण्याची मागणीसंबंधित लेखी निवेदन प्रशासनाला सादर करण्याचे ठरविले आहे.
शेतकरी विकास फाउंडेशनचे संस्थापक कार्यकर्ता मोहन साहेबराव पाटील, मोबाईल क्रं-7588516621 आणि ॲड.गोपालसिंग रणजितसिंह राजपूत मोबाईल क्र.- 9423906281 यांच्याशी संपर्क साधून या निवेदनावर (विनंती) मोठ्या संख्येने स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. तरी शेतकरी विकास फाऊंडेशन ने सर्व संबंधित सभासद व शेतकरी, कर्मचारी, जागरूक नागरिक आणि संघटना यांनी सदर निवेदनावर स्वाक्षरी करून आपला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा