Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

दारुच्या नशेत विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी केले आरोपीस अटक



शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे रात्री तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला . यावेळी एका २४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याने त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाय त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. 

याबाबत माहिती अशी की,भाटपुरा येथील पवन अजमल राठोड हा २५ वर्षीय तरुण दि .१६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास दारूच्या नशेत शेजारी रहाणाऱ्या २४ वर्षीय महिलेच्या घरात घुसला.त्याने नशेतच त्या महिलेचा विनयभंग केला . शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली . याप्रकरणी पीडित महिलेने काल दुपारी पोलिसात फिर्याद दिली असता पवनवर गुन्हा दाखल करण्यात आल.शिवाय त्याला अटकही केली असून पोसई.कृष्णा पाटील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध