Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे - एक प्रेरक शक्ती ! महाराष्ट्र चा महिला या राजकारणात किती अग्रेसर ठरू शकतात याच हे ज्वलंत उदाहरण आहे
संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे - एक प्रेरक शक्ती ! महाराष्ट्र चा महिला या राजकारणात किती अग्रेसर ठरू शकतात याच हे ज्वलंत उदाहरण आहे
खा.सुप्रियाताई सुळे यांची ओळख देशाचे नेते शरद पवार साहेब यांची कन्या अशी असली तरी त्यांनी संधीचे सोने करून स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वारसा कर्तबगार पित्याचा असला तरी कष्ट करून स्वतःला झोकून देऊन सिद्ध करणे सोपे नाही! त्या सतराव्या लोकसभेतील उत्कृष्ट सहभागाबद्दल अव्वल ठरल्या असून सातव्यांदा *संसदरत्न* ठरल्या आहेत! १जुन,२०१९ ते फेब्रुवारी,२०२१ या काळात त्यांनी अतिशय मेहनत घेऊन संसदेमध्ये विविध प्रश्नांवर चर्चेत भाग घेतला. या काळात त्या संसदेमध्ये ९२% उपस्थित राहिल्या, एकूण १६३ चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवला,४०२ प्रश्न उपस्थित केले तर ८ खाजगी विधेयके मांडली. त्या संसदीय कामकाजामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न मांडतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना संसदरत्न ठरविण्यात आले ही महाराष्ट्राच्या द्रुष्टीने अभिमानाची बाब आहे!
माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून गेल्या बारा वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान केला जातो. चेन्नई येथील Prime Point Foundation and Magazine या संस्थेच्या वतीने के श्रीनिवासन यांनी तशी घोषणा केली आहे.
ताईंचा राजकीय प्रवास हा तसा चमत्कारिक आहे. वडील शरद पवार साहेब यांची समाजाविषयी असणारी तळमळ, महाराष्ट्र घडविण्यातील योगदान आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांचे राजकीय संस्कार त्यांनी खूप जवळून अनुभवले. तोच आदर्श त्यांनी गिरवला आहे.
२०११ साली त्यांनी स्त्री भ्रूण हत्येवर एका प्रकारची चळवळ उभी केली आणि ती बघता बघता लोकाभिमुख झाली. मुली जन्मतःच मारुन टाकल्या तर समाजाचा समतोल रहाणार नाही याची जाणीव त्यांना अस्वस्थ करत होती. म्हणून त्यांनी तो प्रश्न हातात घेतला नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाचा एक भाग झाला. कांहीही झाले तरी सामाजिक संवेदना जीवंत राहिल्या पाहिजेत म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात सहभागी व्हायचा निर्धार केल त्यांचे साधे वागणे, संवाद साधण्याची लकब आणि कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची मानसिक तयारी, यामुळे त्या महाराष्ट्रभर फिरल्या!महिलांचे संघटन उभे केले, बचत गटांना शक्ती दिली आणि स्त्रियांना सुध्दा अधिकार दिले तर त्या सुध्दा स्वतःला सिद्ध करु शकतात!हा आत्मविश्वास निर्माण केला. मला असे वाटते की शरद पवार साहेब यांची संयमी भुमिका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निर्णय क्षमता आणि आक्रमकता यांचा मिलाफ म्हणजे खा.सुप्रियाताई आहेत असे म्हंटले तर वावगे ठरू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोग शाळा आहे.जयंत पाटील, सुनील तटकरे, आर आर पाटील आबा, डॉ अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अशी कैक नावे सांगता येतील आणि विशेष म्हणजे अनेकांनी पक्ष सोडले परंतु पक्षाच्या विश्वासार्हतेवर आजही सामान्य माणूस ठाम आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचा प्रचंड सहभाग आहे कारण आहे शरद पवार साहेब यांनी त्यांना समाजकारण आणि राजकारणात मिळवून दिलेली प्रतिष्ठा, मला वाटते खा.सुप्रियाताई या तो विचार घेऊन पुढे जात आहेत!माणसाचा जन्म कुठे व्हावा हे कुणाच्याही हातात नसते पण स्वतःला सिद्ध करणे खूप अवघड आहे. घराणेशाहीचा आरोप करणार्यांनी वारसा जन्माने जरी मिळाला तरीही तो सिद्ध करावा लागतो हे लक्षात घ्या!केवळ बापाच्या, आजोबांच्या नावाने मते मागून मिळत नसतात तर तो सम्रुध्द वारसा फक्त टिकवून चालत नाही तर त्यात वाढ करावी लागते!तेच काम सुप्रियाताई यांनी केले आहे. त्यांनी फक्त बारामती मतदारसंघ बघितला नाही तर महाराष्ट्र आणि देशाचे प्रश्न संसदेत मांडले,तेही सडेतोडपणे!अगदी परवाचे उदाहरण सांगता येईल की पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकार वर घसरले तेव्हा ताई एखाद्या रणरागिणी सारख्या तुटून पडल्या!जिथे अन्याय होतो तिथे प्रहार केले पाहिजेत आणि जिथे चांगले घडते तिथे कौतुक केले पाहिजे.तशा ताई सर्वपक्षीय वाटतात, पक्ष वेगवेगळे असतील पण राजकारणापलिकडे मैत्री जपली पाहिजे, ही साहेबांची शिकवण तंतोतंत पाळतात. आज ताईंना सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, ताई, संसदेत आपले किती खासदार आहेत हे महत्वाचे नाही तर किती खासदारांना डोकी आहेत!?हे खूप महत्त्वाचे आहे. त्या द्रुष्टीने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नशीबवान आहे. बाकीच्या खासदारांबरोबरच डॉ अमोल कोल्हे, सुनील तटकरे यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा