Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

शिरपूर नगर पालिका सभागृहात जनसंघ भाजपचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष स्व. प्रल्हादराव पाटील यांना स्मृतीदिनानिमित्त सर्व पक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील जनसंघ, भाजपाचे ज्येष्ठ नेते, शेतकरी कामगार मजूर व जनसामान्यांचे लोकनेते, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष स्व. तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांच्या दि. ४ फेब्रुवारी रोजी स्मृतिदिनानिमित्त शिवनपच्या सभागृहात प्रतिमेचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचा हस्ते करण्यात आले. 

नंतर भाजपा कार्यालय येथे नवीन तैलचित्राचे (फोटो) अनावरण व प्रतिमा पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी बबनराव चौधरी यांनी स्व. प्रल्हादराव पाटील यांचा कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. 

यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील सह तालुक्यातील व शहारातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील नगरसेवक वासुदेव देवरे, नगरसेवक देवेंद्र राजपुत, हर्षल राजपूत, नगरसेविका सौ. संगिता देवरे, सौ. सुलोचना साळुंखे, शिवसेना  जिल्हा उपप्रमुख भरत राजपूत, चंद्रकांत पाटील, नितीन राजपूत, शामकांत ईशी, नपा प्रशासकीय अधिकारी.संजय हसवाणी, बापु थोरात,केवलसिंह राजपूत, राजेंद्र पाटील,प्रताप सरदार,निलेश गरूड, हेमराज राजपूत,नरेंद्र पाटील,राजु सोनवणे, विनायक कोळी,रोहित शेटे,महेंद्र पाटील,
अमोल पाटील, संतोष माळी, मोहन कोळी,विक्की चौधरी,गिरीश सनेर, प्रशांत राजपूत,प्रकाश गुरव, विशाल पाटील, टिलु पाटील,भुरा पाटील,हेमंत बोरसे, गणेश चौधरी,मंगेश भदाणे,जितेंद्र सुर्यवंशी,
चंद्रकांत गुरव,राजुलाल मारवाडी, सुनिल चौधरी, राधेश्याम भोई, रविंद्र भोई,
अविनाश शिंपी,मुबीन शेख, रफीक तेली आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध