Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या अडचणीत वाढ सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश..!
सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या अडचणीत वाढ सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश..!
सिल्लोड प्रतिनिधी:सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती.याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडून २०१९ साली विधानसभा निवडणूक लढवली होती.त्यांनी २०१९ च्या शपथपत्रात खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याची तक्रार पुण्याचे डॉ.अभिषेक हरदास आणि सिल्लोडचे महेश शंकरपेल्ली यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सिल्लोडच्या कोर्टात याचिकेद्वारे केली.
अब्दुल सत्तार यांच्यावर हे आहेत आरोप-
२०१४ च्या शपथपत्रात दहेगावातील जमीन ५ लाख ६ हजार रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले. तर २०१९ मध्ये हा व्यवहार २ लाख ७६ हजार २५० रुपयांत दाखवला.२०१४ च्या शपथपत्रात सिल्लोडच्या सर्व्हे क्र. ९०/२ ची व्यावसायिक इमारत ४६ हजार रुपयांत खरेदी केली. २०१९ मध्ये खरेदी मूल्य २८ हजार ५०० दाखवले.२०१४ मध्ये सर्व्हे क्र. ३६४ मधील इमारत १६ लाख ५३ हजार रुपये दाखवली. २०१९ मध्ये याची किंमत १ लाख ६५ हजार रुपये आहे.
२०१४ मध्ये निवासी इमारतीचे खरेदी मूल्य ४२ लाख ६६ हजार रुपये दाखवले. २०१९ मध्ये ही किंमत १० हजार रुपये आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी, प्रलंबित व शिक्षित केलेल्या खटल्याची तसेच दिवाणी वादासंदर्भातील माहिती दिली नाही.
शेअर्स,कंपन्यांतील गुंतवणुक,बंधपत्रे, ऋणपत्रे याचा तपशील दिलेला नाही.
१६ फेब्रुवारीच्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी सीआरपीसी कलम २०२ अंतर्गत सिल्लोड पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.पुढील सुनावणी २२ मार्चला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा