Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

५७ हृदयरोग ग्रस्त चिमुकल्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचेकडून जीवनदान



नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती प्रवीण पवार यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आरोग्य विषयक अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आहे. त्यात नवजात बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील लहान मुलांचे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेतले. त्यात 2D Eco, डोळ्यांची तपासणी, अस्तिव्यंग, कॅन्सर, मेंदूविकार, मणक्याचे विकार, त्वचाविकार, कान-नाक-घसा तसेच इतर दुर्धर आजारांचा समावेश होता. यासाठी मुंबई-नाशिक येथील नामांकित रुग्णालयांचे विशेषज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेषज्ञ डॉक्टर्स यांचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिरांत एकूण ५३१ लाभार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. त्यात व्याधिग्रस्थ असलेल्या सर्व रुग्णांना मुंबई नाशिक येथील विविध खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवून गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया औषध उपचार करण्यात आले. यात प्रामुख्याने ५७ अवघड अशा हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी अंदाजे ३ कोटी ८२ लक्ष इतक्या रुपयांचा लाभ देण्यात आला. ह्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. अशा तपासण्या गावोगावी जाऊन तेथील अंगणवाडी शाळा याठिकाणी RBSK च्या डॉक्टरांचे पथके सेवा देत आहेत. ह्यामुळे अनेक गरजू रुग्णांवर ना.डॉ.भारती पवार यांच्या माध्यमातून उपचार होत असल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे आभार व अभिनंदन होत आहे.
नांदगाव येथील रुग्ण मनस्वी मोहिते यांचे वडिल महेश मोहिते यांची प्रतिक्रिया....
आता पेशंटची तब्येत ठणठणीत आहे चेक करून आलो दवाखान्यात व्यवस्थित काळजी घेतली साधारण अडीच ते तीन लाखांपर्यंत खर्च होता तो या शिबिरात मार्फत मोफत झाला. ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक आरोग्य सुविधा किंवा वैद्यकीय चाचण्या बाबत पुरेशी माहिती नसते पण या शिबिरामुळे योग्य ती माहिती मिळाली व तसेच उपचारासाठी नामांकित हॉस्पिटल मध्ये याचा लाभ मिळाला ताई मंत्री झाले आहे याचा आनंद तर होताच पण मंत्री झाल्यानंतर जो काही ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेतले याचा खूप अभिमान वाटला कारण यातून जवळपास माझ्यासारखे गरीब परिस्थितीतील अशा अनेक पालकांच्या मुलांना या शिबिरातून प्रत्यक्ष लाभ मिळाला याचं सुद्धा समाधान वाटत आहे. तसेच आपल्या जिल्ह्यात मोफत आरोग्य व उपचार शिबीर घेऊन खेडोपाड्यातील लोकांना लाभ मिळाला व शिबिरा मार्फत आजाराचे निदान झाले आहे शिवाय त्यांना सुयोग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपचार मिळाले याबद्दल मी डॉक्टर भारती ताई पवार यांचे मनापासून आभार मानतो.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध