Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

आशा सेविकांचे प्रश्न मार्गी न लावल्यास पंचायत समितीवर लाटणे मोर्चा काढण्यात इशारा..!



शिरपूर: प्रतिनिधी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे चार महिन्यांचे थकीत मानधन त्वरीत मिळावे तसेच अन्य प्रश्न तातडीने सोडवावीत अन्यथा दि.१४ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीवर लाटणे मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.काल दि.९ रोजी आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे गटविकास अधिकार्याना निवेदन देण्यात आले . निवेदनानुसार,दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त आहे. 

कोरोना काळात आशासेविका स्वयंसेविका आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांनी जीवाची पर्वा न करता काम केले.लसीकरण मोहीमेसाठी आशा सेविकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत तेथे थांबण्याची सक्ती केली जाते.त्यासाठी केंद्र शासनाने त्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ताही जाहीर केला आहे . 

परंतु ऑक्टोबर २०२१ पासून भत्ता बंद करण्यात आला.शासनाने पूर्ववत करण्याचे आदेश देवूनही भना मिळत नाही.चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही . लसीकरण मोहीमेत व्यस्त असल्याने आशा सेविका,गटप्रवर्तकांना मूळ कामे करण्यासाठी वेळच मिळत नाही.आशा सेविकांना दरमहा मिळणार्या रकमेपेक्षा कमी व तुटपुंजा मोबदला सद्यपरीस्थिती मिळत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

त्यामुळे आशासेविका व गटप्रवर्तकांच्या मनात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे थकीत मानधन तातडीने मिळावे व संघटनेचे अन्य प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि .१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता चोपडा जीन येथून पंचायत समितीवर लाटणे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनावर आशा गटप्रवर्तक संघटने चे जिल्हाध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी , तालुकाध्यक्ष अँड. संतोष पाटील कार्याध्यक्ष डॉ.किशोर सूर्यवंशी पुष्पा महाजन,प्रतिका पाटील,अरूपणा देवरे, छाया चव्हाण ,आशा महिराळे,स्मिता दोरीक,मालती इंदवे,सविता धर्माधिकारी, ठगू बुवा,आशा बुवा आदींच्या स्वाक्षन्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध