Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
केंद्राने पाठविलेला शिष्यवृत्तीचा निधी अखर्चित राहून परत जाण्याची शक्यता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वेधले लक्ष लवकरात लवकर फी मंजुरीची कार्यवाही करण्याची केली मागणी
केंद्राने पाठविलेला शिष्यवृत्तीचा निधी अखर्चित राहून परत जाण्याची शक्यता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वेधले लक्ष लवकरात लवकर फी मंजुरीची कार्यवाही करण्याची केली मागणी
अलीकडेच झालेल्या एका निर्णयामुळे महाडीबीटी पोर्टल वर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या फी मंजुरीचे काम या वर्षीपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सोपविले आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजूर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाडीबीटी वर शिष्यवृत्तीचे अर्ज भरून सुद्धा त्यांचे अर्ज मंजूर करता येत नाहीयेत. हि बाब राज्यभरातून अनेक महाविद्यालयाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या शिष्यवृत्ती विभागाच्या प्रदेश सरचिटणीस सुयश राऊत यांच्या कडे मांडली होती.
या तक्रारीची दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी याबाबत महाविद्यालय, समाज कल्याण व इतर विभागांकडे चौकशी केली असता केवळ शुल्क मंजुरीची ऑनलाईन कार्यवाही झाली नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून अद्याप शुल्क मंजुरी झालेली नसल्यामुळे सदर अर्ज पुढे पाठविता येत नसल्याबाबत महाविद्यालयांनी कळविले. यावर शुल्क नियामक प्राधिकरणाकडे चौकशी केली असता त्यांनी ६ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या मीटिंग चे मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये हि जबाबदारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सोपवल्याचे कळविले. यावर गव्हाणे यांनी तात्काळ उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे संपर्क साधून सदर बाब विभागाच्या लक्षात आणून दिली. त्याच बरोबर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली. तसेच ३१ मार्च पर्यंत जर हे अर्ज मंजूर झाले नाहीत तर, एस.सी, एस.टी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चा केंद्राने पाठविलेला शिष्यवृत्तीचा निधी अखर्चित राहून परत जाण्याची शक्यता आहे हे निदर्शनास आणून दिले
याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज टपाल आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रशांत दिवटे मार्फत मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दोन्हीही मंत्री महोदय यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती चे अर्ज पोर्टलवर स्वीकारले जातील विद्यार्थ्यांनी काळजी न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा