Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचारी हेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्यास* *संस्थेची मान्यता‌काढण्यात येईल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड



मुंबई--सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचारी हेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधान परिषदेत बोलताना त्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये, परीक्षा सुरळीत आणि योग्य पध्दतीने व्हाव्यात यासाठी काळजी घेण्यात आल्यानंतर देखील काल दिनांक १५ मार्च रोजी इयत्ता १० वी च्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण जिल्हा औरंगाबाद येथे कॉपीचा गैरप्रकार समोर आला. येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती गायकवाड यांनी सभागृहात बोलताना दिली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध