Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसेना-भाजपची पुन्हा युती होऊ शकते का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर 'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.
शिवसेना-भाजपची पुन्हा युती होऊ शकते का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर 'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.
नागपूर, 22 मार्च : 'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.भाजप ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर करून त्रास देत आहे.त्यामुळे संबंध ताणले आहे, त्यामुळे परत भाजप-सेना युतीच्या प्रश्न येत नाही' शिवसेना इतर पक्षासारखे नाही एकदा भूमिका घेतली घेतली,असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली.शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.
'दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही.शिवसेना असाा पक्ष आहे,तिथे हे शब्द चालत नाही.खोटे आरोप करणे हा बॉम्ब आहे का ? मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली.ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. तो बॉम्ब नाही का ? असा सवालही राऊत यांनी केला.
यूपीए सरकारच्या काळात 10 वर्षात 23 धाडी पडल्यात. मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात 23 हजार धाडी पडल्यात. ईडी, आयकर विभागाच्या धाडी टाकून तुम्ही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकार पाडणार आणि सत्ता आणणार असा विचार करत असाल तर आम्ही खाली वाकणार नाही, मोडणार नाही,असंही राऊत म्हणाले.
कोल्हापूरची जागा आहे,तिथे शिवसेना जिंकत आली. शिवसेना आणि भाजप एकत्र असताना आमचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. त्या ठिकाणी आता जाधव यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणुक होत आहे. सध्या तिथे त्यांचा अधिकार आहे. 2024 मध्ये पुर्नविचार केला जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा