Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, त्यामुळेच उत्तर प्रदेश मधील अनेक खासदारांच्या मुलांना, मी तिकिट नाकारले असे मोदी म्हणाले..…
भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, त्यामुळेच उत्तर प्रदेश मधील अनेक खासदारांच्या मुलांना, मी तिकिट नाकारले असे मोदी म्हणाले..…
या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आदी बडे नेते
होते उत्तर प्रदेश आचार सहित चार राज्यांमधील निवडणुका जिंकल्यामुळे भाजपा नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर सडेतोड भाष्य केलं. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपा खासदारांच्या मुलांना तिकीट न देण्याचे मीच सांगितले होते, असे म्हणत मोदींनी भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, असे पुन्हा एकदा पक्षातील नेतेमंडळींना सांगितले. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आदी बडे नेते उपस्थित होते.
या बैठकीबाबतचे सविस्तर वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. “या निवडणुकीत भाजपाच्या काही नेत्यांना तिकीट मिळालेले नाही, त्यासाठी मीच जबाबदार आहे. पक्षात घारणेशाहीला स्थान दिले जाणार नाही. अनेक खासदारांच्या मुलांना मी सांगितल्यामुळे विधानसाभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालेले नाही. आपण घराणेशाहीच्या विरोधात आहोत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या बैठकीत त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’वरदेखील भाष्य केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा