Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ मार्च, २०२२
व्हॉटसअॅपवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार ;दोन जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
चोपडा(प्रतिनिधी)-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तिचे व्हीडीओ व फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित शुभम अशोक पाटील,प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि.२५ मार्च २०२२ रोजी शुभम अशोक पाटील (रा.घुमावल बुद्रुक ता.चोपडा) याने २५ वर्षीय महिला हि घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबुन व्हीडीओ कॉल करुन काढलेले व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर टाकुन बदनामी करण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.तसेच दि.२७ मार्च २०२२ रोजी देखील सकाळी ९ वाजता शुभम अशोक पाटील व प्रफुल्ल दिलीप पाटील यांनी महिला घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.याप्रसंगी महिलेने आरडा ओरड केल्याने हे दोघे पळुन गेले.
या घटनेबाबत महिलेने पती,सासू,सासरे यांना सांगितले सदर घटनेचा जाब विचारण्यासाठी सासु,सासरे गेले असता यावेळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील,प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा