Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

क्रिकेट जगतातून अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले



ऑस्ट्रेलिया चा क्रिकेट मधील जग प्रसिद्ध फिरकी गोलंदाजी शेन वोर्न त्याने अचानक जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमध्ये उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये उपस्थित होता, आणि तो बेशुद्ध अवस्थेत आढळला.
वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.”
जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे.
शेन वॉर्नच्या व्यवस्थापनाने एका निवेदनात पुष्टी केली आहे की शेन त्याच्या व्हिलामध्ये मृतावस्थेत आढळला होता आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही तो जिवंत झाला नाही.
कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाल्यानंतर, वॉर्नला क्रिकेट खेळणाऱ्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
त्याच्या निधनाच्या वार्तेने क्रिकेट जगतात खळबळउडाली आहे. अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध