Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील बेहेड,विटाई,राहुड रस्ता दुरुस्ती करण्या संदर्भात आंदोलन माजी शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले यांचा जन आक्रोश मोर्चा
साक्री तालुक्यातील बेहेड,विटाई,राहुड रस्ता दुरुस्ती करण्या संदर्भात आंदोलन माजी शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले यांचा जन आक्रोश मोर्चा
उपरोक्त विषयान्वये साक्री तालुका साक्री भाडणे बहेड मार्गे विटाई राहुड सह नाशिक जिल्ह्यात जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाक तर्फे पूर्ण करण्यात आला होता. परंतु या रस्त्यावर नेहमीच अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यामुळे व त्या भागातील अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे रस्ता अंत्यत खराब झाला आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळणे अवघड झाले आहे. गेल्या अनेक दिवसा पासून ग्रामस्थांची प्रवासासाठी तारांबळ होत आहे. अनेकदा या रस्त्याचे संदर्भात विविध पक्षांकडून आंदोलन देखील करण्यात आली. निवेदन देण्यात आली. तरी देखील त्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले आहे
बेहेड, विटाई, राऊंड, रस्ता दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्याची निविदा झाली. असून आजपर्यंत 30 खड्डे देखील बुजवले गेले नाहीत ही अत्यंत निंदनीय बाब आहे. पंधरा लाख रुपये या कामांचे बिल आदा करण्यात आले आहे. तरी देखील अद्याप कुठल्याही प्रकारची दखल शासनाकडून किंवा संबंधित प्राधिकरना कडून घेण्यात आली नाही. या रस्त्याच्या कामासाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून काम मात्र पूर्ण करण्यात आलेले नाही. हे काम पूर्ण झाले नसताना 15 लाख रुपये बिल अदा करण्यात आले आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी. व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे आंदोलन कर्ते यांचा कडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येत्या काळात काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्या काटवान परिसरातील ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी श्री विशाल आनंदराव देसले यांनी हजारो नागरिकांसह प्रशासनाला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे तथा पालकमंत्री अब्दूल सतार, पोलीस अध्यक्ष, व तहसीलदार या सर्वांना निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष विशाल देसले भूपेश भाई शहा प्रवीण वाणी बाळू शेठ टाकिया बंडू गीते दत्तू गुरव बाळा देवरे अभय शिंदे चेतन थोरात इंदुबाई गायकवाड बाळा खैरनार संभाजी काकुस्ते भरत आप्पा जोशी तुषार जगदाळे भूषण गवळी निलेश कुवर निवृत्ती हिरे बापू गायकवाड ऋतुराज ठाकरे नवनीत बोरसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा