Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

राजेंद्र सावंत राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२२ ने सन्मानित...!



खेड -(अक्षय कदम) नवचैतन्य सामाजिक विकास संस्था (रजि.) यांच्या अनुसंधान महाराष्ट्र राज्यात निस्वार्थ विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गूणिजनांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
        
यावेळी  टिटवाळा येथे वास्तव्यास असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,निस्वार्थी भावनेने समाजसेवा करणारे ज्येष्ठ समाजसेवक तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेले राजेंद्र मधुकर सावंत यांच्या गेली १३ वर्षाच्या   सामाजिक कार्याची दखल घेऊन "नवचैतन्य समाजभूषण पुरस्कार २०२२" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. ३ एप्रिल २०२२ रोजी रेतीभवन, डोंबिवली,जि.ठाणे येथे पार पडला. 

यावेळी व्यासपीठावर रविंद्रजी चव्हाण (आमदार, माजी राज्यमंत्री), प्रमोद रतन पाटील (आमदार कल्याण ग्रामीण), सिने अभिनेते भूषण कडू, लोकशाहीर राजरत्न राजगुरू, वरिष्ठ मार्गदर्शक खंडू रघुनाथ माळवे  (राष्ट्रीय पुरस्कार विजेते) आदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र सावंत यांच्या निरपेक्ष सेवेचा गौरव करण्यात आल्याने समाजाच्या सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध