Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ एप्रिल, २०२२
आद्य गौड महिला मंडळातर्फे गणगोर कार्यक्रम साजरा
शिरपूर ( प्रतिनिधी ) शहरातील मारवाडी ब्राह्मण समाजात आद्य गौड ब्राह्मण महिला मंडळातर्फे गणगोर चा कार्यक्रम खूपच उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम 27 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता राजपूत भवन येथे यशस्वीरित्या पार पडला.आद्य गौड ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुचिता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजात बदल घडवून चांगल्या कार्याची सुरुवात करण्याची व सामाजिक क्षेत्रात विविध योजना व उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला सामाजिक बांधिलकी विषयीची या मंडळाची जिद्द या कार्यक्रमात दिसून आली.
या कार्यक्रमाला शिरपूरच्या माजी नगराध्यक्षसौ संगीता ताई देवरे आणि किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ आशाताई रंधे यांनी प्रमुख अतिथी चे स्थान ग्रहण कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात विविध मनोरंजक स्पर्धा महिलांसाठी आयोजित केल्या होत्या. त्यासाठी सौ उज्वला दायमा व सौ हिरा टोक्शा यांचे पर्यवेक्षण लाभले.सौ प्रिया शर्मा आणि सौ किरण दायमा यांनी सूत्रसंचालन करून उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले.
महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुचिता पंडित यांच्यासह मंडळाच्या सौ रेखा शर्मा सौ ललिता शर्मा सौ सुरेखा शर्मा योगिता शर्मा सौ ज्योती शर्मा सौ सारिका शर्मा सौ जमूना टोक्शा आणि सौ उमा पंडित या सर्व कार्यकारिणीच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे पार पडला. तसेच समाजाच्या युवतींकडून एका उत्कृष्ट नाटिकेचे प्रस्तुतीकरण ही झाले. सर्व आद्य गौड महिला मंडळाच्या वरिष्ठ मातांना सन्मानित करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा