Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
मराठी पत्रकार परिषद सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीच्या राज्य समन्वयक पदी कन्हैया खंडेलवाल यांची निवड
मराठी पत्रकार परिषद सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीच्या राज्य समन्वयक पदी कन्हैया खंडेलवाल यांची निवड
मुंबई- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य आघाडीच्या समन्वयक पदी हिंगोली चे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित गंगाखेड तालुका पत्रकार संघ आयोजित आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने मराठी पत्रकार परिषद सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे यांच्या सहकार्याने पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांची राज्याच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे यांच्या सोबतीने मराठी पत्रकार परिषदेची ताकद वाढविण्यासाठी सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया बळकट करण्यासाठी पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांच्यावर राज्य समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांच्या झालेल्या नियुक्तीचे मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख,विश्वस्त किरण नाईक,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी, प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन यांनी कौतुक केले आहे. नियुक्ती वेळी कन्हैया खंडेलवाल यांच्यासोबत मराठी पत्रकार परिषद हिंगोली चे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल,मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष विजय दगडू,हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले, कळमनुरी तालुका अध्यक्ष अलीम कादरी, सौरभ साकळे,नारायण काळे,संजय शितळे आदिंनी उपस्थित राहून अभिनंदन केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा