Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
केशरानंद समुहाचे प्रमुख ज्ञानेश्वर भामरेंवर फसवणुकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल वयोवृद्ध महिला फिर्यादीने अमेरिका स्थित मुलासह दाखल केला दाखल केला धुळे-दोंडाईचा येथील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
केशरानंद समुहाचे प्रमुख ज्ञानेश्वर भामरेंवर फसवणुकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल वयोवृद्ध महिला फिर्यादीने अमेरिका स्थित मुलासह दाखल केला दाखल केला धुळे-दोंडाईचा येथील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
सी.ए.मोदी साहेबांंवरही प्राँपर्टी बळकावल्याचा आरोप.दाऊळ येथील एक आरोपी दोंडाईचा पोलीसांच्या ताब्यात...
भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरेंसह इतर नाँट रिचेबल आहेत
हाई प्रोफाइल आरोपींना शोधणे-दोंडाईचा-धुळे पोलीसांपुढे आव्हान..नवीन वयोवृद्ध कायद्यातर्गंत वयोवृद्ध महिलेला न्याय लवकर मिळेल काय-सर्वसामान्य कुटूंबात प्राँपर्टी वरून निर्माण झालेली परिस्थितीवर निर्माण झालेले जाणकार लोकांचे मत
आहे म्हणजे दोंडाईचा शहरात केव्हा काहीही होऊ शकते.म्हणजे कोण राजाचा रंक होईल व रंकचा राजा हे सांगता येत नाही.एखाद्या हवेत जास्त उडायला लागला तर वेळेनुसार वेळेवर जमिनीवर आणले जाते आणि एखाद्या जमिनीवर चालत असेल तर त्याच्या नशीबाने त्याला हवेत सुद्धा उडतांना लोकांनी पाहिले आहे.
म्हणजे मागील दोन-तीन-चार वर्षापासुन कोणा मोठ्या-सज्जन-समाजसेवक माणसासोबत केव्हा काय चांगली-वाईट बातमी बाहेर पडेल, हे सांगता येत नाही आणि असाच एक वयोवृद्ध महिलेला प्राँपर्टीच्या कारणाने फसवणुकीचा प्रकार समोर आला असुन त्यात चक्क आजी जिल्हा परिषद सदस्य व धुळे जिल्ह्यात नावाजलेले केशरानंद समुहाचे प्रमुख ज्ञानेश्वर भामरे व त्या वयोवृद्ध महिलेचा अमेरिका स्थित मुलासंह एकुण सहा जणांवर फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनला काल दिनांक ०६/०५/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दोंडाईचा पोलिसांनी दाऊळ येथुन संतोष पाटील नामक व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी दिलेली तक्रार अशी की,मी श्रीमती फाखेराबाई आशिकअली बोहरी, वय-८२,व्यवसाय सुखवस्तू राहणार सेंट्रल बँकेच्यावर,शिवाजी रोड, दोंडाईचा ता. शिंदखेडा,जि.धुळे समक्ष विचारले वरून फिर्याद लिहून देते की,वरील नमुद दिल्या पत्यावर मी,माझा नातू म्हणजेच मुलगी अतुलबाईचा मुलगा आजम शब्बीरभाई मर्चंट हा माझेजवळ लहानपणापसून व त्याची पत्नी सकीना आजम मर्चंट हि सुमारे दहा वर्षापासून असे माझे सोबत राहतात. माझे पती आशिकअली मर्चंट हे दिनांक २७/०३/२०२१ रोजी मयत झाले आहेत. मला माझे पती यांचपासून दोन अपत्य आहे.एक मुलगा आबिदभाई आशिकअली मर्चंट-बोहरी व मुलगी बतुलबाई शब्बीर मर्चंट-बोहरी असे असून मुलगा आबिदभाई आशिकअली मर्चंट हा सुमारे वीस वर्षापासून नोकरी निमित्ताने बाहेर देशात यु.एस.ए. येथे आहे.
मुलगी मतुलबाई शब्बीर मर्चंट हि तिचे परिवारासह नंदुरबार येथे राहण्यांस आहे. माझा मुलगा आबिदभाई व दाऊळ येथील राहणारे सध्या वास्तव्यास दोंडाईचा येथे असलेले ज्ञानेश्वर आनंदा भामरे हे
लहानपणा पासून वर्ग मित्र आहेत.ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांनी माझे पती हे हयात असताना मी सध्या वास्तव्यास असलेली माझे मालकीची इमारत (माझे राहते घर) वेळोवेळी विकत घेण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती.परंतु ते आमचे राहते घर असल्याने आम्ही त्यांना नकार दिला होता. माझा मुलगा हा बाहेर देशात असल्याने गेल्या वीस वर्षात तो मला व माझे पती हयात असताना साधरणत: तीन-चार वेळेस आला असेल. मुलगा आबिद याने बेंगलोर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करून लागलीच त्याने प्रेमविवाह केल्याने त्याचे घरी येणेजाणे कमी झाले होते.
माझे पती हे दिनांक २७/०३/२०१ रोजी मयत झाले तरी देखील मुलगा आबिद हा अंतविधी करीता व उत्तरकायांकरीता देखील आला नाही. आमचा पुर्ण सांभाळ नातू आजम शब्बीरभाई मर्चंट व त्याची पत्नी सकीना हेच करीत आहेत. मुलगा आबिद आशिक अली मर्चंट हा फेब्रुवारी २०२२ हया महिन्यात विदेशातून दोंडाईचा येथे माझे राहते घरी आला.तारीख नक्की मला सांगता येणार नाही.त्यावेळेस मुलगा आबिद हा मला माझा नातु आजम व त्यांची पत्नी सकीना यांचे समक्ष म्हणाला की, तुझ्या तब्बेतीची काळजी वाटते म्हणून मी तुझ्या सर्व तपासण्या माझा लहानपणीचा मित्र ज्ञानेश्वर भामरे यांचे धुळ्याच्या दवाखान्यातून करून घेईल असे सांगतिले.त्यानंतर दिनांक १०/०२/२०२२ रोजी वार गुरुवार रोजी माझा मुलगा आबिद याने मला सांगितले की, आपल्याला मित्र ज्ञानेश्वर भामरे याचे घरी जेवण्याकरीता बोलविले आहे,असे नातू आजम व नात सुन सकीना यांचे समक्ष सांगून ज्ञानेश्वर भामरे यांचे मालकीचे पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गाडीत बसवून त्यांचे दोंडाईचा येथील राहत असलेल्या केशरानंद नावाच्या बंगल्यात एकटीस बसवून घेवून गेला.सदर ठिकाणी मी व माझा मुलगा आबिद असे जेवण करीत होतो. त्यावेळेस सदर ठिकाणी आमचे जवळ दोन पुरुष होते.
तेव्हा मी त्यांची विचारणा केली असता सदर दोन्ही व्यक्ती हे ज्ञानेश्वर भामरे यांचे दवाखान्यातील आहेत व ते माझा वैद्यकीय फाँर्म भरण्याकरीता आलेले आहेत असे माझा मुलगा मला म्हणला. माझे जेवण झालेनंतर त्यांनी मला वैद्यकीय चाचणी करीता फाँर्म भरावयाचा आहे असे सांगून माझे कडून वेगवेगळ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यावेळेस मी माझे मुलाचे सांगण्यावरून त्याचेवर विश्वास ठेवून मी सदर ठिकाणी सहया केल्यात.त्यानंतर सुमारे तीन-चार दिवसांनी मुलगा आबिद याने ज्ञानेश्वर भामरे याच्या मालकीच्या पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गाडीत बसवून मला केशरानंद हाँस्पीटल धुळे येथे वैद्यकीय तपासणी नावाखाली घेवून गेले. मी घरून निघतांना नातू आजम यांस सांगितले की, लवकर परत येते.मुलगा आबिद याने धुळे येथील केशरानंद हाँस्पीटल येथे नेले.सदर ठिकाणी माझी वैद्यकीय तपासणी करण्यात आली व तेथील डक्टरांनी सांगितले की, ऍडमिट करायची गरज नाही.त्यानंतर हाँस्पीटल येथून निघून मला मुलगा आबिद हा ज्ञानेश्वर भामरे यांचे धुळे येथील राहते घरी घेवून गेला तेथे एक दिवस आम्ही थांबलो. सदर ठिकाणी मी, मुलगा आबिद व ज्ञानेश्वर भामरे अशांनी सोबत जेवण केले. त्यानंतर पुन्हा दिनांक १९/०२/२०२२ रोजी वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली मुलगा आबिद हा धुळे येथे हाँस्पीटलला घेवून जातो असे सांगून पुन्हा ज्ञानेश्वर भामरे यांचे मालकीच्या पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गाडीने मला दोंडाईचा येथील राहते घरून घेवून गेला. परंतु मला दवाखान्यात न घेवून जाता ज्ञानेश्वर भामरे यांचे धुळे येथील राहते घरी नेले. त्यानंतर मंगळवारी (दिनांक २२/०२/२०२२) रोजी मला केशरानंद हाँस्पीटल येथे नेले.सदर ठिकाणी मला डक्टरांनी तपासले. त्यानंतर मुलगा आबिद हा मला पुन्हा ज्ञानेश्वर भामरे यांचे धुळे येथील राहते घरी घेवून गेला व तेथे त्याने मला सांगितले की, आपल्याला मुंबई येथे मेंदूच्या डक्टरांकडे जावे लागेल.तेव्हा मी आबिद यांस सांगितले की,मला नातू आजमशी बोलायचे आहे. तेव्हा आबिद हा माझेकडेस बघून दातमिठया खात होता. परंतु त्याने मला नातू आजम याचेशी बोलणे करून दिले नाही. त्यानंतर शुक्रवारी (दिनांक २५/०२/२०२२) रोजी मी,मुलगा आबिद असे ज्ञानेश्वर भामरे यांचे पांढऱ्या रंगाचे गाडीने मुंबई येथे जाण्याकरीता सकाळी सहा वाजता निघालो.त्यावेळेस मी मुलगा आबिद यांस म्हणाले की,माझा सावत्र भाऊ हा अझर हा डक्टर आहे.
तो मुंबईतच राहतो व तो डक्टर असल्याने त्याला फोन लाव. परंतु त्याने फोन लावला नाही.आम्ही नाशिक येथे पोहचे पावेतो मी वारंवार मुलगा आबिद यांस माझा भाऊ अझर यांस फोन लावण्यांस सांगत होते. परंतु तो माझे काहीएक ऐकत नव्हता. म्हणून आमचे दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा मला मुलगा आबिद म्हणाला की, आपण मुंबई येथे जात नाही.आपण पुण्याला जात आहे.तेथे तुला वृध्दाश्रमामध्ये ठेवायचे आहे. तु माझी आई नाहीस, तुला दोंडाईंचा येथे ठेवायचे नाही. दोंडाईचा येथील घर मी हे ज्ञानेश्वर भामरे यांस विकून दिले आहे. ते घर आता तुझे राहिलेले नाही.तेव्हा मी गाडीत आरडा-ओरड करू लागले. त्यानंतर आबिद हा मला घेवून साक्री, दहिवेल मार्गे नंदुरबार येथे नेले. नंदुरबार येथे पोहचल्यावर मुलगा आबिद याने माझी मुलगी मतुलबाई हिचा लहान मुलगा अब्बास मर्चंट यांस फोन केला व मला चौफुलीवर सोडून मुलगा आबिद हा निघून गेला. मी नंदुरबार चौफुलीवर असताना मला घेण्यांस मुलगी मतुलबाई, नातू अभ्यास मर्चंट व जावई शम्मीर मर्चंट हे मला घेण्यास आले. तेथून मी त्यांचे सोबत त्यांचे नंदुरबार येथील राहते घरी गेले.तेथे मी माझे सोबत घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर मी दोन दिवसांनी माझे राहते घरी दोंडाईचा येथे आले.तेव्हा मी माझा नातू आजम मर्चंट व नात सुन सकीना हिस घडलेली सर्व हकीगत सांगितली.तसेच इयत्ता तिसरी शिकलेली असून आम्ही आमचे घरात गुजराथी भाषेतच बोलतो व तसेच मला दैनंदिन डायरी लिहीण्याची सवय आहे.
मी कुठे बाहेर गांवी जात असले तर त्यांचे मध्ये लिहीत असते, किंवा माझे सोबत काहीजरी घडले. तरी ती त्यात लिहीत असते. मी माझे नातू आजम मर्चंट यांस सांगितले होते की,मुलगा आबिद याने आपले राहते घर हे ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांस विकले आहे.त्यावरुन नातू आजम मर्चंट यांने मी राहत असलेल्या घराची माहीती तलाठी ऑफीस, रजिस्टर ऑफीस,तसेच नगरपालिका येथून गोळा केली.त्यावरून नातू आजन मर्चट याने मला सांगितले की,पावर ऑफ ऍटनी व मृत्युपत्र हे मुलगा आबिद याने त्याचे नावाने बनवुन घेतले असून तेव्हा मी नातू आजम यांस सांगितले की,मी कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलेच नाही.तेव्हा माझी खात्री झाली की,माझा मुलगा आबिद आशिकअली मर्चंट व त्याचा मित्र ज्ञानेश्वर आनंदा भामरे व त्याचे सोबत कागदपत्रावर नमुद असलेले तीन साक्षीदार तसेच ड्रायव्हर यांनी सहमतीने कटकारस्थान रचून मला माझे वैद्यकीय तपासणी करण्याचे बहान्याने फसवून मला काहीएक न विचारता माझी संमती नसताना देखील खरेदी विक्रीचे व पावर ऑफ ऍटर्नीचे दस्तऐवजावर सहया घेवून रजिस्टर ऑफीस शिंदखेडा येथे सादर करून मी वयोवृध्द असलयाचा गैरफायदा घेवून माझे राहते घर व माझी इतर मिळकत बळकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी माझे नातू आजम मर्चंट, याचे मदतीने संबंधीत दुय्यम निबंधक कार्यालय येथे जावून वरील बनविलेल्या दस्तऐवजांवर हरकत घेतली. तेव्हा दुय्यम निबंधक यांना ते देखील गोत्यात येतील. हया भितीने त्यांनी तात्काळ मी दिलील्या हरकतीबाबत कार्यवाही करून लागलीच माझे राहते घराविषयी झालेला खरेदी विक्रीच्या व्यवहाराशी संबंधीत पावर ऑफ ऍटर्नी व मृत्युपत्र हे रद्द केलेत.सदर दस्तऐवज मिळणेबाबत मी पत्रव्यवहार करून प्राप्त केले असता मृत्यू पत्राचा व्यवस्थापक म्हणून १) श्री. जी.बी.मोदी, चार्टर अकाउंटर, रा.मोदीनगर, ड.भतवाल यांच्या जवळ, धुळे.२) श्री. ज्ञानेश्वर आनंदा मामरे रा. दाऊळ ता. शिंदखेडी, जि. धुळे यांची नेमणूक झाल्याचे नोंद आहे. तरी फ्रेबुवारी २०२२ या महिन्याचे दिनांक १०/०२/२०२२ ते दिनांक २५/०२/२०२२ रोजी पावेतो. हया दरम्यान माझा मुलगा १) आबिद आशिकअली मर्चंट श.1737 ट्रेन्टोन रोड, प्रिन्स्टन जंक्शन यु.एस.ए. (अमेरीका), २) ज्ञानेश्वर आनंदा भामरे, रा. केशरानंद व्हिला, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे ३) विजय खंडू काकुस्ते रा. दोंडाईचा, शिंदखेडा, जि. धुळे ४) संतोष मार्तंड पाटील, रा. दाऊळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे ५) ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांचे पाँढऱ्या रंगाच्या गाडीवरील ड्रायव्हर नांव माहित नाही. साधरणतः ४० ते ४५ वयोगटाचा ६) श्री. जी.बी. मोदी, चार्टर अकऊंटर, रा.मोदीनगर, ड.भतवाल यांच्या जवळ,धुळे अशांनी मी बयोवृध्द असल्याचा फायदा घेवून माझे नांवे असलेली मिळकत प्राँपर्टी, माझे राहते घर अशांबाबत मला काहीएक विचारपुस न करता, मला केशरानंद हाँस्पीटल येथे वैद्यकीय तपासणी करण्याचा बहाणा बनवून ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांचे दोंडाईचा येथील केशरानंद येथील राहते घरी सदर ठिकाणी वैद्यकीय कागदपत्र आहेत असे सांगून माझ्या सहया घेवून मुलगा आबिद आशिकअली मर्चंट याचे नांवे पावर ऑफ ऐंटनी व मृत्युपत्र बनवून ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांचेशी परस्पर व्यवहार करून दोंडाईचा येथे ऑफलाईन रजिस्टर नोंदणी करून वरील सर्व इसमांनी संगनमातने कटकारस्थान रचून,खोटे बोलून माझी फसवणुक केली आहे. म्हणून माझी वरील नमुद इसम क्रमांक ०१ ते ०६ यांविरुध्द फिर्याद आहे.
माझी वरील संगणकीकृत टंकलिखीत फिर्याद हि मी वयोवृध्द असल्याने माझे राहते घरी येवून पोलीसांनी महिला पोलीस अंमलदार वर्षा नाना गोपाळ यांचे समक्ष नोंदवून सदरची फिर्याद हि मला हिंदी भाषेत पोलीसांनी समजावून सांगितली. तसेच नातू आजम शब्बीर मर्चंट याने मला गुजराती भाषेत समजावून सांगितली आहे. समक्ष हि फिर्याद दिली सही. दिनांक ०५/०५/२०२२ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश एस. मोरे करत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
समाजात विषमता निर्माण झाली की असे प्रकार प्रत्येक घरात दिसतील 2014 पासून प्रलोभन आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन राजकीय नेते जोश मध्रित्रत्वाचे नाते हितसंबंध जपण्यासाठी घाई करतात आणि संपती वदादित आहे किंवा नाही याची khatr jma n करता shining इंडिया सारखे आपले ही आयुष आपल्याच कमाईतून निर्माण करत आहेत परंतु काही लोक सत्य परिस्थिती न मांडता पोलिस तक्रार आणि वकिली डावपेच मध्ये गुर्फडताना दिसत आहेत,
उत्तर द्याहटवा