Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मे, २०२२

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार, धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुक....


धुळे,सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबतचे आदेश दिल्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. त्यात राज्यातील नागपूर, वाशीम, पालघर, नंदुरबार, धुळे, आणि अकोला आदी जिल्हा परिषदेतील दोन निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील सहा निर्वाचक गणांच्या रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकीचा घोषणा करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे की,पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील दोन निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील सहा निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोट-निवडणुकांसाठी पाच जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर सहा जून २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
यावेळी पाच जूनला मतदान होईल. तर सहा जूनला मतमोजणी केली जाईल.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान होईल.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध