Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
मोबाईल मेडिकल युनिटच्या वाहनाचा नंदूरबार लोकसभा मतदार संघाचा लोकप्रिय खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते शुभारंभ
मोबाईल मेडिकल युनिटच्या वाहनाचा नंदूरबार लोकसभा मतदार संघाचा लोकप्रिय खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते शुभारंभ
धुळे, दि.11 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धडगाव व तळोदा येथील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी दोन मोबाईल मेडिकल युनिट (फिरते रुग्णालय सेवा ) च्या वाहनाचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद कोकणी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.एन.एन.बावा, वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, आर.डब्ल्यू प्रमोशनचे मॅनेजर शशिकांत सोनी, जिल्हा समन्वयक निलेश शर्मा तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
या मोबाईल युनिट वाहनामार्फत धडगाव व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत नाही अशा ठिकाणी ह्या मोबाईल युनिटच्या मार्फत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर व स्तनदामाता तपासणी, साथजन्य परिस्थितीतील उपचार, सिकलसेल, ॲनेमिया, रक्त,लघवी तपासणी तसेच आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार या मोबाईल युनिटच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच तपासणी करतांना जोखीमग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्वरीत पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. या मोबाईल युनिट वाहनात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक फॉर्मासिस्ट, वाहनचालक असे कर्मचारी वर्ग या युनिटमध्ये राहणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा