Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२
बंडखोर शिंदे विरुद्ध ठाकरे सत्ता संघर्षाचा फैसला 25 ऑगस्ट ला ?
सुप्रीम कोर्टातील प्रकरण पाच सदस्य घटनापिठाकडे वर्ग
मुंबई मिलिंद माने महाराष्ट्रातील मागील दोन महिन्यापासून सत्ता संघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर काय निर्णय होणार याबाबत आजपर्यंत अनिश्चित होती अखेर आज हा विषय ऐनवेळी सुनावणीला घेऊन अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी चालू झाल्यानंतर याबाबत अस्तित्वात असलेल्या समितीने या प्रकरणाची सुनावणी पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत बंडखोर शिंदे गटाने खरी शिवसेना आमची असून धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे याबाबत देखील याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी आज दुपारी तीन वाजता होणार होती मात्र याबाबत देखील न्यायालयाने दोन दिवस कोणताही निर्णय घेऊ नये अशी स्थगिती देऊन 25 तारखेला याबाबत सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय 25 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयावर होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा