Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
सटाणा तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यात यश-खा.डॉ.सुभाष भामरे सटाणा तालुक्यातील केळझर डावा कालवा व चारी क्रमांक-8 या कालव्याचे जलपूजन कार्यक्रम माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला
सटाणा तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यात यश-खा.डॉ.सुभाष भामरे सटाणा तालुक्यातील केळझर डावा कालवा व चारी क्रमांक-8 या कालव्याचे जलपूजन कार्यक्रम माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला
सटाणा तालुक्यातील केळझर डावा कालवा व केळझर चारी क्रमांक-8 या दोन्ही कालव्यांना 2017 मध्ये युती शासनाच्या काळात प्रशासकीय मान्यता खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने झाली होती पंधरा ते वीस वर्षापासून बंद झालेले काम खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून सुरू झाले व आज त्याचा 20 ते 25 गावांना प्रत्यक्ष पाणी पोहोचले आहे त्यामुळे सर्व गावातील शेतकरी खुश होते त्यांनी स्वयंस्फूर्तीने खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते जलपूजन कार्यक्रम करून जल्लोष केला न होणारे काम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते सटाणा तालुक्यातील सर्व सिंचनाचे प्रश्न मार्गी लावताना उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र भाऊ फडणवीस व तात्कालीन जलसंपदा मंत्री व आत्ताचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले या दोन्ही कालव्यांच्या रूपाने 20 ते 25गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे तसेच या कालव्याच्या पुढील भाग वाढीव केळझर चारी क्रमांक 8 याचे देखील काम सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जसे आज कौतिकपाड्या पर्यंत पाणी पोहोचले तसेच पाणी भाक्षी मुळाणे कर्ह चौगाव अजमिर सौंदाणे देवळाने सुराने या गावांपर्यंत आपण पाणी पोहोचवणारा तो प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आहे .
सटाणा तालुक्यातील हरणबारी डाव्या कालव्याचे 42 कोटी रुपयांचे टेंडर झालेले आहे आता हरणबारी डाव्या कालव्याचे काम पूर्णत्वास झालेले दिसेल हरणबारी डाव्या कालव्यासाठी यापूर्वीच 2017 सालीच सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून घेतलेला आहे तळवाडे भामेर पोहच कालवा याला देखील 2017 साली २१ कोटीचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे .परंतु मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कालव्याच्या काही भाग वाहून गेला त्यामुळे वाहून गेलेल्या भागात नवीन कामे होऊन ते देखील काम अंतिम टप्प्यात आहे हरणबारी उजवा कालवा याचे देखील प्रशासकीय मंजुरीसाठीचा सर्व पायऱ्या पूर्ण झालेले आहेत त्याचे पाणी उपलब्ध करून आरक्षित करून घेतलेले आहे व त्याचे नवीन सर्वेक्षण करून घेतलेले आहे त्याची त्याची डिझाईन मेरी मधून मंजूर करून घेऊन शासनास सादर करून त्यास निधी उपलब्ध करून त्याचे काम देखील लवकर सुरू करणार आहोत
तसेच अप्पर पुंनद साठी देखील पाणी आरक्षित झाले असून पुढील कामास लवकरच गती देणार आहोत आजच्या कार्यक्रमात पाऊस असताना देखील शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात दिसला त्याचा मला मनापासून आनंद होत आहे आज मला माझे जीवन सार्थक झाले असे उदगार डॉक्टर बाबा भामरे यांनी काढले आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ.शेषराव पाटील भाजपा नेते साहेबराव सोनवणे श्रीधर तात्या कोठावदे सुधाकर बापू रौंदळ चेअरमन ,प्रभाकर रौंदळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा ,ज्ञानेश्वर देवरे ,राजू आबा जाधव, वटांर चे उपसरपंच खैरनार, तरसाळीच्या सरपंच मंगलाबाई मोहन, मंगेश खैरनार भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप पवार योगेश सूर्यवंशी जिभाऊ मोरकर ,सुरेश मोरे ,दिलीप अहिरे, लखन पवार गुंण्णा राजपूत तसेच लाभ क्षेत्रातील वटार विंचुरे डोंगरेज विरगाव वनोली तरसाळी कौतिक पाडे भाक्षी मुळाने येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा