Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

चेकपोस्ट बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.दरम्यान, नंदुरबारसह १० प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आठ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हद्दीत असलेल्या राज्य सीमा तपासणी नाक्यांबाबतही अहवाल मागवला आहे.



धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील राज्य सीमा तपासणी नाके R T O चेकपोस्ट लवकरच होणार बंद धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील १८ सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबतचा अहवाल नुकताच परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.यानुसार हे नाके येत्या काही दिवसांत बंद होतील,अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

२०१७ मध्ये केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेवा व वस्तूकरांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यांच्या सीमांवर परिवहन तपासणी नाके असू नयेत,असे कळविले होते.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून तपासणी नाके बंद करण्यासाठी अहवालांची पडताळणी सुरू झाली आहे.दरम्यान ,३ ऑगस्टला परिवहन उपआयुक्त अभय देशपांडे यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर सीमा तपासणी नाक्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्रव्यवहार करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार सीमा तपासणी नाके बंद आहेत किंवा कसे हे तपासण्याचे आदेश देत आरटीओकडून सीमा तपासणी नाक्यांच्या फोटोसह

वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे कळवले होते.या पत्राची दखल घेत नंदूरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना चेक पोस्टबाबत अहवाल दिला असल्याचे सांगितले आहे.यातून येत्या काही दिवसांत परिवहन उपआयुक्तांच्या आदेशाने नवापूरचे

चेकपोस्ट बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान,नंदुरबारसह १० प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आठ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हद्दीत असलेल्या राज्य सीमा तपासणी नाक्यांबाबतही अहवाल मागवला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध