Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या कणा समजल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्र मध्येच महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित
शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या कणा समजल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्र मध्येच महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित
शिरपूर प्रतिनिधी - शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या कणा समजल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्र मध्येच महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असून आरोग्य सेवेच्या बोजवारा उडाला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा वर्करचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून सायंकाळी उशिरा तालुका पोलीस ठाण्यात आरोग्य सेवकावर अट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोग्य सेवक म्हणुन महेश देवराम ईशी रा.शिरपुर यास तालुका पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.याप्रकरणी वकवाड येथील व्यवसायाने आशावर्कर असलेल्या 30 वर्षीय महिलेने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील वकवाड आरोग्य उपकेंद्राअंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशावर्कर यांच्या मार्फत गावात कुष्ठरोग,क्षयरोग,गरोधर माता सेवा,व ईतर आरोग्य संदर्भात सर्व्हे करण्यात येत असताना 14 सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आलेल्या सर्व्हेत सदर आशा वर्कर महिलेने चुकीचा सर्व्हे केल्याचे फोनवरून सांगून नव्याने सर्व्हे करण्यासाठी बारा वाजेच्या सुमारास आरोग्य सेवक महेश ईशी याने आरोग्य उपकेंद्रात बोलावून घेतले.
दरम्यान उपकेंद्रातील क्लिनीक रुममध्ये चुकीचा सर्व्हे केल्याबद्दल समजावीत असतांना आरोग्य सेवक महेश ईशी याने स्त्री मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची तक्रार सदर आशावर्कर महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.दाखल तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगासह अट्रोसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा