Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२
पांढरेवाडी येथील निम्नखैरी प्रकल्प तुडूंब...
परंडा(राहुल शिंदे) दि.१९ तालुक्यातील पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प रविवारी सायंकाळी १००%तुडूंब भरून सांडव्यावरून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवसातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्वच धरणात पाणी साठा मोठ्याप्रमाणात झाला आहे. यावर्षी अगदी ऑगस्ट पासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व नदी, नाले, ओढे, विहिरी, तलाव पाण्याने भरलेले आहेत.
पांढरेवाडी येथील प्रकल्पात सुमारे १०.५६ दशलक्ष घन मी इतका पाणी साठा झाला आहे. याचा लाभ पांढरेवाडी, चिंचपूर (बु) , माणिकनगर, शेळगाव, सक्करवाडी, लंगोटवाडी या गावांना मोठ्या - प्रमाणात होत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत आहे. या प्रकल्पातील पाणी साठा पाहण्यासाठी परिसरातील नागरीक गर्दी करत आहेत यामुळे एकाध्या पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा